Ramtek Lok Sabha elections (file photo) esakal
नागपूर

Ramtek Lok Sabha: रामटेक लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार? गावातील पारावर चर्चा, नंतर वाद..एकाचा मृत्यू

Ramtek Lok Sabha: रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार यावरून झालेल्या हाणामारीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सावरगावमधून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Sandip Kapde

Ramtek Lok Sabha:

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडले आहे. राज्यात ४८ जागांसाठी मतदान पार पडले. दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार यावरुन चांगलाच वाद झाला आहे. या वादाचे रुपांतर हणामारीत होवून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

रामटेक लोकसभेच्या निवडणुकीत कोण जिंकणार यावरून झालेल्या हाणामारीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावात ही घटना घडली.  गावातील पारावर बसलेल्या तरुणांना मध्ये रामटेक लोकसभा निवडणूक कोण जिंकणार यावर जोरदार चर्चा सुरू होती. या चर्चेचे रुपांतर नंतर वादात झाले. चर्चेत वादाची ठिणगी पडली आणि वाद वाढून हाणामारी मध्ये बदलला. यात नाजूक जागी मार लागल्याने सतीश फुले तरुणाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान आरोपी प्रवीण बोरडे याला मारहाण प्रकरणी पोलिसांनी सावरगावमधून ताब्यात घेतले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने रामटेक लोकसभा मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा बनवला आहे.

शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांच्यामध्ये लढत झाली आहे. आधी काँग्रेसकडून रश्मी बर्वे मैदानात होत्या मात्र जात वैधता प्रमाणपत्र ऐन वेळी रद्द झालं. या मतदारसंघात सहा विधानसभा आहेत.

रामटेक लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कल आणि विविध घटक पाहता महायुती अडचणीत आल्याचा अंदाज बांधला जात आहे. रामटेक, हिंगणा, उमरेड आणि सावनेर विधानसभा मतदारसंघात महायुती मतांच्या बाबतीत मागे पडू शकते. काटोल आणि कामठीमध्येच महायुतीसाठी चांगले वातावरण पाहायला मिळाले. त्यातही कामठी नगर परिसरात परिस्थिती चांगली नव्हती. महायुतीतील आमदार, उमेदवार निवड, वंचित बहुजन आघाडीची बदलती भूमिका आदी मुद्द्यांचा मतदारांवर प्रभाव पडला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT