Why did I get married in a poor house? Why did I get married in a poor house?
नागपूर

माझे लग्न गरीब घरात का केले? मुलीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट

पोलिस कर्मचाऱ्यांनी बारीकीने घटनास्थळाची पाहणी केली असताना पोलिसांना महिलेने लिहिलेली डायरी सापडली

सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा (जि. नागपूर) : ‘ज्या दिवशी माझे साक्षगंध झाले, तो माझ्या जीवनातील काळा दिवस होता. माझे एका गरीब घरात लग्न करून दिले. मैत्रिणी माझ्यापेक्षाही गरीब असताना त्यांचे लग्न श्रीमंत घरी व उच्चशिक्षित मुलाशी झाले. परंतु, माझे कुटुंब उच्चशिक्षित असूनही माझे लग्न गरीब घरात केले.’ नैराश्‍य मनात दाटल्यामुळे अश्विनी हरिदास रणमले (वय २५) हिने आत्महत्तेचे टोकाचे पाऊल (suicide news) उचलल्याचे तिच्या डायरीतील मजकुरावरून उघड झाले आहे. (Why did I get married in a poor house?)

सरकारी नोकरीवर असणारा मुलगा नवरा म्हणून मिळावा, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. त्यानुसार अश्‍विनीच्या आई-वडिलांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असणाऱ्या हरिदास रणमले (रा. घानमुख, ता. महागाव, जि. यवतमाळ) या मुलाशी लग्न करून दिले. २९ डिसेंबर २०२१ रोजी अश्विनी व हरिदास यांचे लग्न मोठ्या थाटा माटात पाप पडले. लग्नात मोठ्या प्रमाणात खर्च सुद्धा करण्यात आला. मुलीकडील सर्व उच्चशिक्षित व नोकरीवर होते.

हरिदास हा गरीब घरातील आहे. त्याला २०२० मध्ये शिक्षक म्हणून सरकारी नोकरी लागली. त्याला सहा हजार रुपये मानधन मिळत आहे. लग्न झाल्यानंतर तो सात जानेवारीला जलालखेडा येथे राहायला आला. पती, पत्नी व अश्‍विनीची आजी जलालखेडा येथे किरायाने राहू लागले. मुलगा रोज वाढोणा येथील जिल्हा परिषद शाळेत जायचा व मुलगी गृहिणी असल्यामुळे दिवसभर घरी राहत होती.

रविवारी (ता. ३०) आजी परत गावी केली असता मंगळवारी (ता. १) दुपारी तीन वाजताच्या सुमारास अश्विनी हरिदास रणमले (वय २५) हिने गळफास लावून आत्महत्या केली. तिने आत्महत्या का केली?, याचा उलगडा झाला नव्हता. उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव, ठाणेदार हरिश्चंद्र गावडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी बारीकीने घटनास्थळाची पाहणी केली असताना पोलिसांना महिलेने लिहिलेली डायरी सापडली. डायरीत (Diary text) जे लिहिले होते, ते वाचून पोलिसांना आश्चर्यच झाले. आत्महत्या करणाऱ्या महिलेने तिचे लग्न गरीब मुलाशी झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचे निष्पन्न झाले.

आजी गावी जाताच लावला गळफास

आजी सोबत राहत असल्यामुळे ती असे टोकाचे पाऊल उचलू शकली नाही. आजी गावी जाताच तिने गळफास लावून आत्महत्या (suicide news) केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नागेश जाधव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार हरिश्चंद्र गावडे, सहकारी दिनेश हिवसे, रणजित रोकडे, सातंगे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kondhwa Gun Firing : आयुष कोमकरच्या खुनाचा बदला? सहा गोळ्या झाडून कोंढव्यात गणेश काळेचा मर्डर

Jalgaon Politics : जळगाव शहरात 'ठाकरे' गटाला मोठा हादरा! माजी महापौर नितीन लढ्ढांसह १५ नगरसेवकांनी धरला भाजपचा हात

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील डॉक्टर निर्भया यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी दाखल

Crime News: नाक चाव्याची दहशत! उंदरासारख्या दातांनी अर्धा डझन लोकांची कुरतडली नाकं, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Railway News: प्रवाशांना दिलासा! ट्रेनमध्ये ट्रान्सजेंडर लोकांकडून त्रास होतो का? वाचण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सोपा मार्ग सांगितला

SCROLL FOR NEXT