Why did Mayor Joshi go to court against Commissioner Mundhe? 
नागपूर

आयुक्त मुंढेविरोधात महापौर जोशी का गेले कोर्टात ?

राजेश प्रायकर

नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेडचे (एनएनएससीडीसीएल) सीईओ असल्याचे गैरकारभार केला. याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका महापौर संदीप जोशी आणि सत्तापक्षनेते संदीप जाधव यांनी संयुक्तपणे जिल्हा व सत्र न्यायलयात दाखल केली. या याचिकेवर 15 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. 

महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एनएनएससीडीसीएल संचालक मंडळाला विश्‍वासात न घेता सीईओपदी असल्याचे सांगून अनेक निर्णय घेतले. यात प्रकल्प रद्द करणे, कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना न देता काढणे, बॅंकेची दिशाभूल करून स्वतःच्या स्वाक्षरीसह एका कंपनीला 20 कोटी रुपये देणे अशी प्रकरणे सामील आहेत.

कंपनीचे अधिकृत सीईओ नसताना केलेले आर्थिक व्यवहार गैरप्रकारात मोडणारे आहेत. त्यामुळे महापौर संदीप जोशी, सत्तापक्षनेते संदीप जाधव यांनी 22 जूनला सदर पोलिस स्टेशनला तक्रार केली. आठ दिवसांत या तक्रारीवर काहीही झाले नसल्याने 30 जून रोजी पोलिसांना स्मरणपत्र देण्यात आले.

हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते. परंतु, त्यापुढे काहीही झाले नसल्याने महापौर संदीप जोशी, सत्तापक्षनेते संदीप जाधव यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाचे दार ठोठावले. 

पोलिसांचे "स्मार्ट' उत्तर 
याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने महापौर संदीप जोशी, सत्तापक्षनेते संदीप जाधव यांना एक पत्र पाठवून ही तक्रार पोलिसांशी संबंधित नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे स्मार्ट सिटी सीईओपदाबाबतची ही तक्रार स्मार्ट सिटी कंपनीकडेच पाठविण्यात येत असल्याचेही पोलिसांनी पत्रात नमूद केले. त्यामुळे हे प्रकरण आता महापौरांनी कोर्टात नेले. 

 
चोराने केलेल्या चोरीची तक्रार आपल्याशी संबंधित नसल्याचे सांगून पोलिसांनी ती चोराकडेच पाठविली. त्यामुळे आम्ही आता न्यायालयात न्याय मागणार आहे. सामान्य नागरिकांविरोधात तक्रार आल्यास तत्काळ गुन्हा नोंदविणारे पोलिस राजकीय दबावात असल्याची शंका आहे. मुंढे यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी निःपक्षपणे व्हावी. 
संदीप जोशी, महापौर. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT