file photo 
नागपूर

मिरगीचे झटके का येतात? का व कशामुळे होतो हा आजार? जाणून घेऊया... 

केवल जीवनतारे

नागपूर : जगात पाच कोटी मिरगीचे रुग्ण आहेत. त्यात दरवर्षी पन्नास लाखांची भर पडते. त्यात 80 टक्के रुग्ण हे अल्प उत्पन्न असणाऱ्या देशांतील आहेत. त्यापैकी सरासरीने 50 हजार लोक दगावतात, हे आढळून आले आहे. या आजारामुळे 10 लाख लोकांना हा मिरगी म्हणजे फिट्‌स येतात. चला तर, जाणून घेऊया मिरगी या रोगाविषयी.... 

जिथे डुकरांची संख्या अधिक असते वा डुकरांचा मुक्तसंचार लोकवस्तीत असतो, तिथे टेनिया सोलियम म्हणजे फीत जंतांच्या अळ्या तयार होतात. हे सिस्टिक लार्व्हे संसर्गित डुकरांच्या मांसपेशीत जातात. दूषित पाण्यामधून वा जमिनीवर होणाऱ्या कच्च्या पालेभाज्यांमधून फीत जंताचे अंडे मनुष्याच्या पोटात गेले तर ते रक्ताद्वारे मेंदूपर्यंत जातात आणि त्यामुळेच फिट्‌स अर्थात मिरगीचे झटके येतात, असा सूर जागतिक मेंदूरोगतज्ज्ञांच्या चर्चेतून पुढे आला. 

मेंदूशी निगडित जंतुसंसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांवर जागृती करण्यासाठी वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी विभाग आणि फोरम फॉर इंडियन न्यूरोलॉजी एज्युकेशनच्या वतीने जागतिक पातळीवर वेबिनार मालिकेतून चर्चा सुरू आहे. उद्‌घाटन सत्रात न्यूरो सिस्टी सरकोसिस या विषयावर जगभरातील मेंदूरोगतज्ज्ञांनी प्रकाश टाकला. 

सिस्टी सरकोसिस हा आजार प्रामुख्याने लॅटिन अमेरिका, दक्षिण-पूर्व आशिया आणि आफ्रिका या देशांमध्ये राहणाऱ्या लोकवस्तीत मोठ्या प्रमाणात आढळला आहे, असे नमूद करीत पेरू येथील डॉ. हेक्‍टर गार्सिया म्हणाले की, मेंदूमध्ये या आजाराचे वेगवेगळे प्रकार आढळले आहेत. यात एक सिस्ट वा अनेक सिस्टमेंदूमध्ये असू शकतात. या सिस्ट मेंदूमध्ये काही महिने ते अनेक वर्षे वास्तव्य करतात. सिस्ट फुटल्यामुळे मेंदूमध्ये सूज येते आणि मिरगीचे झटके येतात. काही वर्षांनी या सिस्ट मरतात आणि मेंदूत कॅल्शियम जमा होते. 

वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे माजी अध्यक्ष प्रोफेसर डॉ. राड शाकिर म्हणाले की, मेंदूचा हा सिस्टी सरकोसिस आजार टाळण्यासारखा आहे. हा आजार डुकरांमुळे पसरतो. हाच धागा पकडत ट्रॉपिकल न्यूरॉलॉजी संघटनेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले की, या आजारावर नियंत्रणासाठी लस उपलब्ध आहे. डुकरांना ही लस आणि औषध देणे हा प्रकल्प राबवण्याची जरज आहे. देशातील सर्व खेड्यात शौचालय तयार झाले आणि डुकराचे मांस खाऊ नये यावर जनजागरण केले तर या रोगावर नियंत्रण मिळू शकते. 

समाजात मिरगीबाबत अनेक गैरसमजुती आहेत. त्यामुळे जनजागृतीची गरज आहे. मिरगीच्या रुग्णाला कांदा, चप्पल हुंगवतात. मात्र, रुग्णास याचा काहीही उपयोग होत नाही. पती-पत्नीच्या घटस्फोटास मिरगी अर्थात अपस्मार कारणीभूत ठरतो. न्यूरॉलॉजिस्टकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये 50 टक्के रुग्ण डोकेदुखीचे असतात. 30 टक्के मिरगीचे असतात. मिरगीवर हमखास औषध आहे. मिरगी जनजागरणाची चळवळ उभारण्याची गरज आहे. 
-डॉ. चंद्रशेखर मेश्राम, अध्यक्ष, ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुप ऑफ वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी, 
 

संपादन : मेघराज मेश्राम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT