कान्होलीबारा : न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले मासेमार कुटुंबीय.  
नागपूर

पोलिस मासेमारांच्या घरी जाउन का धमकावितात बरे ?

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा (जि.नागपूर) : मासेमारी करू तेव्हाच चिलापिलांसह कुटुंबाला दोन वेळचा घास मिळतो. पोटासाठी संघर्ष करणेच आमच्या वाट्याला असतानाच लॉकडाउनच्या काळातच व्यवसायावर गदा येणे सुरू झाले. मासेमारांना धमकाविणे, त्यांची विनाकारण चौकशी करणे, त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्याचा प्रकार पोलिसांकडून सुरू असून, मासेमारबांधवांनी या प्रकरणी न्यायाची मागणी केली आहे.

150 कुटुंबाच्या रोजगारावर संक्रांत
हिंगणा तालुक्‍यातील कान्होलीबारा, खडकी या जलाशयावर 150 पेक्षा अधिक कुटुंबे वास्तव्याला आहेत. परंतु, काही दिवसांआधी कान्होलीबारा, खडकी जलाशयाचा लिलाव होऊन महामाया मागासवर्गीय मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था मर्या. घोराड (ता. कळमेश्वर) यांना किमान दोन वर्षांआधी मिळाला. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विभागाच्या नियम व अटीनुसार स्थानिक मासेमारांना रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक होते. परंतु, जलाशयावर संबंधित संस्थेतर्फे कुणीही येत नसून परप्रांतीय मासेमारांना मासेमारीसाठी आणले जाते. त्यामुळे स्थानिक मासेमारांचे हाल होत आहेत.
लॉकडाउनच्या या काळामध्ये प्रशासनाला सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. परंतु, कान्होलीबारा येथे संबंधित संस्थेकडून मासेमारांवर वेगवेगळे आरोप लावून त्यांना धमकावून जीवे मारण्याच्या धमक्‍या दिल्या जातात. तसेच पोलिससुद्धा मासेमारांच्या घरी जाऊन घराची चौकशी करून जेलमध्ये टाकण्याच्या व मारण्याच्या धमक्‍या देत आहेत. विशेष म्हणजे ज्या मासेमारांवर साधे एफआरसुद्धा नाहीत. मासेमारांना धमकविणे, त्यांच्या घराची चौकशी करणे, मासेमारांना पोलिस चौकीमध्ये बोलावून धमकविण्याचा अधिकार कुणी दिला, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

अमानुष वागणूकीकडे विशेष लक्ष द्या !
नागपूर रेड झोनमध्ये असून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा परिस्थितीमध्ये संबंधित संस्थेचे काही लोक नागपूरवरून रोज येणे-जाणे लॉकडाउनमध्ये कसे करतात व गावामध्ये मासेमारांच्या घरी जातात. त्यामुळे गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. प्रशासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी भोई समाज क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष अमोल बावने यांनी केली. मासेमारांवर लॉकडाउनमुळे उपासमार व रोजगाराचा मोठा प्रश्न उद्‌भवलेला असून संबंधित संस्था तसेच पोलिस प्रशासनाकडून होत असलेल्या अमानुष वागणुकीकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. तसेच मत्स्यव्यवसाय विभागाने संबंधित संस्थेवर कारवाई करून तलाव ठेका रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार समीर मेघे, खासदार कृपाल तुमाने, सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्याकडे दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्ट संतापलं! आदेश न पाळणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, उशिरा अपीलही चालणार नाही

Donald Trump : एपस्टीन फाईल्सचा दुसरा पार्ट! डोनाल्ड ट्रम्पनी १५ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा आरोप, अमेरिका सरकारने कागदपत्रे केली सार्वजनिक

Pune News : आशासेविका मानधनाविना; तब्बल दोन हजार महिलांना पाच महिन्यांपासून निधी नाही

Latest Marathi News Live Update : शेवटची गोळी आणि सैनिक असेपर्यंत आम्ही लढणार; इराणचे उपपरराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांचा ठाम निर्धार

Success Story: शेतकऱ्याच्या मुलाची भरारी; अजित देशमुख यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT