Why there is a problem for online education 
नागपूर

ऑनलाइन शिक्षणासाठी का होतेय अडचण....वाचा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : करोनामुळे राज्यात शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. यावर उपाय म्हणून बऱ्याच शाळांनी ऑनलाइन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी शाळांकडून ऑनलाइन क्‍लासेस घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, शहरासह ग्रामीण भागात इंटरनेटचे "नेटवर्क' मिळत नसल्याने पालक त्रस्त झाले असल्याचे चित्र आहे.


शहरात जवळपास चाळीसहुन अधिक सीबीएसई शाळा आणि जवळपास दोनशे इंग्रजी शाळांचा समावेश आहे. यानंतर मराठी आणि हिन्दी माध्यमांच्या शाळा आहेत. गेल्या काही वर्षात सीबीएसई व इंग्रजी शाळांकडे पालकांचा कल वाढला असल्याने त्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची गर्दी होताना दिसून येते. मात्र, यावर्षी करोनामुळे शाळेत विद्यार्थ्याला पाठविण्याची मानसिकता सध्या पालकांमध्ये नसल्याची दिसून येते. हे हेरून बऱ्याच सीबीएसई आणि इंग्रजी शाळांनी एक जून आणि त्यापूर्वीपासून ऑनलाइन क्‍लासेस घ्यायला सुरुवात केली.

बऱ्याच शाळांद्वारे ऑडिओ आणि व्हीडिओ तयार करीत पालकांच्या मोबाईलवर पाठविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पाचवी ते आठवीच्या मुलांना ऑनलाइन क्‍लासेसद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. मात्र, ऑनलाइन क्‍लासेस घेत असताना, बरेचदा इंटरनेट नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांना विषय समजण्यास अडचण होत असल्याचे चित्र आहे. या प्रकाराने पालक त्रस्त झाले आहेत. शाळांद्वारे सुरू करण्यात आलेल्या या प्रकाराने एकीकडे पालक त्रस्त असून दुसरीकडे त्यांची डोकेदुखी वाढली आहे. दररोज ऑनलाइन क्‍लासेसची तयारी आणि नेटवर्क शोधण्यातच त्यांचा बराच वेळ निघून जात असल्याचे दिसून येते.
 
नेट पॅकचा खर्च वाढला
शाळांद्वारे दररोज किमान एक ते दीड तासाचे ऑनलाइन क्‍लासेस घेण्यात येतात. याशिवाय शाळांकडून मोबाईलवर व्हीडिओ आणि ऑडिओ पाठविण्यात येतात. यापूर्वी एक जीबी डाटावर संपूर्ण कुटूंबाचे काम चालायचे. मात्र, आता ऑनलाइन शिक्षणामुळे शाळांकडून पाठविण्यात आलेले व्हीडिओ आणि ऑडिओ डाऊनलोड करण्यासाठी पालकांना दररोज दोन ते तीन जीबी डाटा खर्ची घालावा लागतो. त्यामुळे इंटरनेटचा खर्चही वाढला आहे.


"ऑनलाइन क्‍लासेस ही खरच दररोजची डोकेदुखी ठरलेली आहे. बरेचदा इंटरनेट नेटवर्क मिळत नसल्याने क्‍लासेसला कनेक्‍ट होता येत नाही. त्यामुळे त्यात बराच वेळ जातो.
वैशाली जवणे, पालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

SCROLL FOR NEXT