wife and husband died on day by day in nand of bhiwapur nagpur 
नागपूर

अख्खं गाव हळहळलं! पत्नीवर अंत्यसंस्कार झाले अन् दुसऱ्याच दिवशी पतीनेही सोडला जीव

गोकुल वैरागडे

भिवापूर (जि. नागपूर ) : आजारी पतीची सेवा करत असताना पत्नी अंजना सूर्यभान गभने यांचा मृत्यू झाला. अंत्यसंस्काराच्या दुसऱ्याच दिवशी हा धक्का सहन न झाल्याने त्यांच्या पतीचाही मृत्यू झाला. ही घटना नांद येथे घडली असून एकाच घरातील दोन जीव गेल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

सेवानिवृत्त आदर्श शिक्षक  सुर्यभान गभने  हे सन २००४ ला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी आपले घर व शेती सांभाळली, तर अंजना या गृहिणी म्हणून कार्यरत होत्या. सूर्यभान गभने यांना तिन-चार वर्षांपूर्वी पॅरालिसीसचा अटॅक आला होता . तेव्हापासून ते आजारीच होते. त्यांची देखभाल पत्नी व मुले करीत होते.  अंजनाबाई हे पतीची सेवा करीत असतानाच १७ जानेवारी रोजी रविवारला त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य धक्का आला. त्यामुळे त्यांना उमरेड येथील रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा १८ जानेवारीला मृत्यू झाला. त्यांच्या १९ जानेवारीला त्यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी २० जानेवारीला सकाळीच सूर्यभान गभणे यांचा मृत्यू झाला. एकाच घरातील दोन जीव एकावेळी गेल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT