नागपूर

‘तू मोठा माणूस होणार आहे, स्वतःची काळजी घे’ अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या

अनिल कांबळे

नागपूर : अभियंता असलेल्या पतीसोबत क्षुल्लक कारणावरून वाद (Argument for trivial reasons) झाला. रागाच्या भरात मुलासह ती माहेरी निघून आली. मात्र, पतीच्या विरहात तणावात जीवन जगत होती. शेवटी तिने घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. रिया ऊर्फ पौर्णिमा समित अवथनकर (३४, रा. चिटणीस पार्क) असे मृत महिलेचे नाव आहे. (Wife commits suicide in husbands absence)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया हिचे एमसीए पदवी घेतली होती. तिचे पुण्यातील नामांकित कंपनीत इंजिनिअर असलेल्या सुमीत यांच्याशी २०१६ मध्ये लग्न झाले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पतीसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. कौटुंबिक तणाव वाढत असल्यामुळे रिया चार वर्षांच्या मुलाला घेऊन माहेरी नागपुरात आली होती.

नोव्हेंबरमध्येच तिचे पती आणि सासरे या दोघांना कोरोना झाला होता. दरम्यान, रिया पुण्याला गेली. त्यांची भेट घेऊन परत आली. रियाने मंगळवारी रात्री दहा वाजता जेवण केले आणि बरे वाटत नसल्याचे सांगून ती झोपायला निघून गेली. तिने मध्यरात्रीनंतर सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी दरवाजा ठोठावला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रियाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

‘तू मोठा माणूस होणार आहे...’

रिया यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मुलाला उद्देशून सुसाईड नोट लिहिली. ‘तू एक दिवस मोठा माणूस होणार आहे. मी माझ्या जीवनात अयशस्वी झाली. जीवनात काहीही करू शकली नाही. परंतु, तू यशस्वी होणार आहे. तू स्वतःची काळजी घे.’ असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

(Wife commits suicide in husbands absence)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

SCROLL FOR NEXT