The wife murdered her husband with the help of her boyfriend Nagpur murder news 
नागपूर

पतीच्या मृतदेहाशेजारी पत्नीने काढली रात्र; प्रियकराच्या मदतीने डोकं आपटून केला खून

अनिल कांबळे

नागपूर : अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचे डोके आपटून खून केला. पतीच्या मृतदेहाशेजारी प्रियकरासोबत रात्र काढल्यानंतर पोलिसांना फोन करून पतीचा हार्टअटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव केला. तसेच तासाभरातच प्रियकरासोबत पळून गेली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत ८ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर बब्बू कनोजिया (वय ४७, रा. दंतेश्वरनगर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सरिता शेख कनोजिया (वय ३८, रा. दंतेश्वरनगर) आणि पंकज चंद्रकांत कडू (वय २५, रा. सोनेगाव) यांना अटक केली आहे. त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शेखर हा पत्नी सरिता व दोन मुलींसह शारदानगरात राहत होता. मोठ्या मुलीचे लग्न झाले तर दुसऱ्या मुलीचा पाच महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे तो तणावात राहत होता. दोघेही पती-पत्नी कपडे इस्त्री करण्याचे काम करीत होते. सरिताचा स्वभाव मनमोकळा होता. त्यामुळे ती परिसरात अनेकांशी बोलत होती. तिचा स्वभाव शेखरला खटकत होता.

तिचे वस्तीत राहणाऱ्या पंकज नावाच्या युवकासोबत मैत्री झाली. पंकजचे घरी येणे-जाणे सुरू झाले. शेखर घरातून बाहेर जातात पंकज घरी येत होता. दोघांचे संबंध शेखरला खटकले. त्याने अनेकदा पंकज आणि रिया यांची समजूत घातली आणि पंकजलाही घरी न येण्याची तंबी दिली. पंकजला घरी येण्यास मनाई केल्यामुळे सरिता नाराज झाली. त्यावरून तिने पतीशी भांडण केले. मात्र, ती पंकजसोबचे संबंध तोडण्यास नकार देत होती.

पतीने सोडल घर

पत्नीचे पंकजसोबत असलेले संबंध खटकत असल्यामुळे शेखर भावाकडे राहायला निघून गेला. पती नसल्यामुळे पत्नी सुधरेल आणि पंकजचा नाद सोडून देईल असे वाटत असतानाच तिने पंकजला घरी आणले. त्याच्याशी तिचे संबंध अधिक घट्ट झाले. पाच महिन्यांनंतर तो पुन्हा पत्नीकडे परत आला. दोघेही पती-पत्नी सोबत राहायला लागले. ही बाब आता पंकजला खटकायला लागली. त्यामुळे घरातील वातावरण पुन्हा बिघडले.

साहेबऽऽ माझा नवरा मेला

रियाने ८ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. ‘साहेबऽऽ माझा नवरा बेशुद्ध पडला आणि मेला’ अशी माहिती दिली. एमआयडीसी पोलिस घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी शेखरचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाच्या छातीवर जबर मारहाण केल्याच्या खुना होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला ध्रुव राठी, पहाटे दुबई विमानतळावरून केलं होतं उड्डाण, कुटुंबीय अजूनही अडकलेले

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

भाजप की राष्ट्रवादी? अमरावती मनपाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? 'या' दिवशी होणार निर्णय, सभापती पदासाठी महायुतीत चढाओढ

Ajit Pawar: बारामती वैद्यकीय रुग्णालयास अजित पवार यांचे नाव; राज्य शासनाने घेतला निर्णय

Video : 'असा' झाला शुभविवाह मालिकेचा शेवट ! अभिनेत्रीने शेअर केले Behind The Scene

SCROLL FOR NEXT