नागपुरी संत्रा sakal
नागपूर

नरखेडात संत्रा, मोसंबी प्रक्रिया प्रकल्पाची वानवा

आशिया खंडातील सर्वात मोठी संत्र्याची बाजारपेठ म्हणून नरखेड तालुक्याची ओळख आहे.

मनोज खुटाटे : सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा (जि. नागपूर) : जिल्ह्यातील नरखेड तालुका संत्रा उत्पादकांचा तालुका म्हणून सुप्रसिद्ध आहे. आशीया खंडातील सर्वात मोठी संत्र्याची बाजारपेठ म्हणून नरखेड तालुक्याची ओळख आहे. या तालुक्यात ११ हजार हेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात संत्र्याचे तर ५ हजार हेक्टरमध्ये मोसंबीचे उत्पादन घेतले जाते. परंतु तालुक्यात कुठेच कोल्डस्टोरेज व वेअर हाऊस सुविधा नाही, तसेच संत्रा व मोसंबीवर प्रक्रिया करणाऱ्या केंद्राची वाणवा असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा माल मिळेल त्या भावात म्हणजे कवडीमोल भावात विकावा लागतो.

शेतकरी मोसंबी व संत्र्याचे आंबिया व मृग अशी दोन बहरातील पीक घेतात. सद्या आंबिया बहारातील संत्रा व मोसंबी उत्पादनाला सुरुवात झाली आहे. परंतु बाजारपेठेत मोसंबी व संत्र्याला भाव नाही. तरी त्यांना हे फळ पीक ठेवण्यासाठी कोल्डस्ट्रोजची सोया नसल्याने कमी भावात माल विकावा लागत आहे. ज्या क्षेत्रात मोसंबी व संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते, त्या क्षेत्रात एकही संत्रा व मोसंबी प्रक्रिया प्रकल्प नाही, ही शोकांतिका आहे.

या उरलेल्या मोसंबी व संत्र्यांच्या कमी किंमतीमुळे संत्रा व मोसंबी उत्पादक अडचणीत आला आहे, अशा परिस्थितीत शेतकरी खर्च भागवू शकत नाहीत. यामुळे आतातरी शासनाने शेतकऱ्यांचा विचार करून नरखेड तालुक्यात कोल्डस्ट्रोज व संत्रा व मोसंबीवर प्रक्रिया करणारे केंद्र उभारावे. जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा माल जेव्हा चांगला भाव मिळेल, तेव्हा विकता येईल व दोन पैसे त्याच्या हातात जास्त येईल, अशी मागणी आता संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकरी करीत आहे.

शासन मागील अनेक वर्षापासून प्रकल्प राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण प्रत्यक्षात संत्रा उत्पादक भागात प्रकल्प नसल्याने शेतकऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांनी समोर येत नाबार्डद्वारे सबसीडीचा मोठ्या प्रमाणात लाभ घेऊन या तिन्ही गोष्टी करणे गरजेचे आहे. माझे संपूर्ण सहकार्य नाबार्डच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात राहिल.

- कृपाल तुमाने, खासदार

निवडणूका आल्या की फक्त शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी करून अश्वासने देऊन मते मागितली जाते. पण निवडणुका झाल्या की शेतकऱ्यांचा विसर पडत असतो. त्यामुळेच आम्हा शेतकऱ्यांचे हे हाल आहेत.

- सुधाकर बढिये, शेतकरी, जलालखेडा

मागील २५ वर्षांपासून स्थानिक आमदार मंत्री होते, पण मतदारसंघातील संत्रा उत्पादकांच्या समस्यांकडे त्यांचे लक्ष नव्हते. परिणामी नरखेड तालुक्यात संत्रा उत्पादनासबंधी कोणतीही सोयीसुविधा उपलब्ध झाली नाही.

- उकेश चव्हाण, उपाध्यक्ष, भाजप, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT