woman committed to suicide in nagpur crime news 
नागपूर

लग्नासाठी घेतलेल्या साडीनेच घेतला गळफास, फेसबुकवरील प्रेमाचा करुण अंत

अनिल कांबळे

नागपूर : फेसबुकवरून फ्रेंडशिप झाल्यानंतर पळून आलेल्या दाम्पत्यामध्ये घरगुती वाद झाला. त्यामुळे प्रेयसीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. स्विटी ऊर्फ चित्रा राज धुर्वे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विटी ही मूळची काटोलची आहे, तर तिचा प्रियकर राज रामभाऊ धुर्वे (२६) हा मूळचा मध्यप्रदेशातील आहे. दोघांची २०१९ मध्ये फेसबुकवरून ओळख झाली होती. दोघांची मैत्री वाढल्यानंतर फोनवरून चॅटिंग सुरू झाले होते. तो मध्यप्रदेशवरून नागपूरला तिला भेटायला आला होता. स्विटीने त्याला प्रपोज करीत लग्नाची मागणी घातली. त्यानेही लग्नाची कबुली दिली. स्विटीच्या कुटुंबीयांनी तिला प्रेमविवाह करण्यास नकार दिला. त्यामुळे तिने थेट घर सोडण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे राजनेही आईवडीलांना प्रेमविवाचा प्रस्ताव ठेवला. त्यांनीही राजला विरोध केला. त्यामुळे दोघांसमोर पेच पडला.

स्विटीने त्याला पळून जाऊन लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यानेही मध्यप्रदेश सोडून नागपुरात राहायला येण्यास तयारी केली. २०२० मध्ये राज घरदार सोडून नागपुरात आला, तर स्विटीही आईवडीलांना सोडून आली. दोघांचीही सीताबर्डीत भेट झाली. त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. स्विटीकडे काहीही पैसे नव्हते तर राजने मित्रांकडून १० हजार रूपये आणले होते. त्यांनी सर्वप्रथम गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत आदर्शनगर, टेकडीवाडी येथे घरमालकाला पती-पत्नी असल्याचे सांगत रूम भाड्याने घेतली. स्विटीला साड्या आणि मंगळसूत्र घेतले आणि संसाराल सुरुवात केली. स्विटीने तिच्या माहेरबाबत काहीही सांगितले नाही, तर राजने आपल्या कुटुंबीयांची ओळख दिली. दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहत होते. राजला नागपूर एमआयडीसीतील प्लास्टो कंपनीत नोकरी लागली होती. परंतु, स्विटी चिडखोर असल्यामुळे त्यांच्यात खटके उडत होते. 

लग्नाच्या साडीने घेतला गळफास - 
शुक्रवारी सकाळी राज आणि स्विटीमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर तो नोकरीवर निघून गेला. चिडलेल्या स्विटीने लग्नासाठी घेतलेल्या साडीनेच घरातील सिलींग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजाऱ्यांनी राजला फोन करून माहिती दिली. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT