नागपूर : भरधाव टिप्परने दुचाकीस्वार मायलेकींना धडक दिली. मुलीच्या डोळ्यांदेखत आईने प्राण गमावले. ही दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री पारडी परिसरातील एचबी टाऊन मार्गावर घडली.
करुणा कांबळे ( वय 41) रा. पवनशक्तीनगर, डम्पिंग यार्डसमोर असे मृत आईचे नाव आहे. गुरुवारी रात्री 8.45 वाजताच्या सुमारास मुलगी महिमा (17) आईला आपल्या मोपेडवर बसवून आजीच्या घरी जाण्यासाठी निघाली. घरापासून काही अंतर पुढे जाताच दिलीप सावजी भोजनालयासमोर भरधाव टिप्परने मागून जोरदार धडक दिली. यात करुणा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर महिमाने कसेबसे स्वत:ला सांभाळले. आईला रुग्णालयात नेण्यासाठी ती गयावया करीत होती. परंतु, आईचा आधीच मृत्यू झाल्याचा अंदाज वाटसरूंना आला होता. घटनेनंतर बघ्यांची एकच गर्दी होऊन मोठा तणाव निर्माण झाला होता. या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. आईच्या मृत्यूमुळे महिमा कमालीची हादरली. पोलिसांनीच तिला धीर देत सावरण्याचा प्रयत्न केला. आरोपी टिप्परचालक मोहम्मद अली कलामउद्दीन अन्सारी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. महिमाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.
भाचीच्या नवऱ्याने मामेसासऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी यशोधरानगर हद्दीतील टिपू सुल्तान चौकातून जाणाऱ्या रिंगरोडवर घडली. अनिल मेश्राम (रा. यशोधरानगर) असे जखमीचे तर युवराज गजभिये (रा. पांढराबोडी) असे जावयाचे नाव आहे. मेश्राम वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पत्नीला नेहमीच त्रास देतो. या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी मुलांना घेऊन वेगळी राहते. मेश्राम यांनी युवराजची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचाच राग मनात धरून मंगळवारी सकाळी त्याने धारदार शस्त्राने चेहऱ्यावर वार केला. परिसरातील लोकांच्या मदतीने ते कसेबसे रुग्णालयापर्यंत पोहोचले. त्यांना 17 टाके लागले आहेत.
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.