Pix_Pratik
Pix_Pratik
नागपूर

सायकलवर समोसे विकत ओढते संसाराचा गाडा; मातेचा मुलांसाठी संघर्ष

प्रतीक बारसागडे

नागपूर : लग्न करुन गोंदियावरून (Gondia) नागपूरला (Nagpur) आले. नवे नवलाईचे नऊ दिवस भरकन उडून गेले. नवरा हॉटेलमध्ये काम करायचा. फावल्यावेळी इतर ठिकाणी मोलमजुरी करत दोन पैसे जोडत होता. यथावकाश संसारवेलीवर दोन मुले उमलली. दरम्यान, पतीला काविळ झाला. त्यात इतर रोगांचीही भर पडली व अचानक एक दिवस त्यांचे निधन झाले. दिव्यांग मुलगा व मुलीची जबाबदारी अंगावर येऊन पडली. काही ठिकाणी मोलकरीण म्हणून काम सुरु केले. (woman selling samosa on roads in Nagpur during lockdown)

सकाळीच उठायचे, मुलांची तयारी करून त्यांना शाळेला पाठवायचे. नंतर घरकामाला निघून जायचे असा दिनक्रम सुरु होता. दुपारी थोडा वेळ मिळायचा. त्या वेळात हॉटेलमध्ये काम करण्यास सुरवात केली. विशेष म्हणजे इतर कामे करतानाच येथे समोसे बनवण्याची पद्धती शिकून घेतली. सहजपणे शिकलेले हे ज्ञान पुढे चालून कामाला येईल असे त्यावेळी वाटलेही नव्हते.

दिनेश्वरी (पिंकी) मोरेश्वर जांभूळकर त्यांची आपबिती सांगत होत्या. मागील वर्षी कोरोनाने शहराला विळखा घातला. लॉकडाउनची घोषणा झाली. प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने बऱ्याच ठिकाणचे घरकाम बंद झाले. इतर कामधंदेही बंद असल्याने कुठे मजुरीसाठीही जाऊ शकत नव्हते. एक दिवस आईसोबत चर्चा करताना जाणवलं की आपल्याला समोसे बनवता येतात. समोसे बनवून विकले तर निदान दोन वेळचं अन्न मिळण्याची शक्यता होती. समोसे विक्रीतून जीवनाचा गाडा ओढता येईल असा मनाने कौल दिला. विक्रीसाठी ना हॉटेल होते ना जागा होती.

विचाराअंती लक्षात आले की आपल्याला सायकल चालवता येते. मग सायकवरूनच समोसे विक्री करावी. सुरवातीला काही दिवस अवघडल्यासारखे वाटायचे. नंतर मात्र सवय झाली. विशेष म्हणजे दोन तीन घरची कामेही पुन्हा सुरु झाली. यामुळे सकाळी अकरा वाजेपर्यंत तेथील घरकाम आवरून दुपारी सायकल घेऊन समोसे विक्री करते. समोसे विक्रीतून दिवसभरात २०० ते ३०० रुपये हाती येतात. यातून म्हाताऱ्या आईचे औषधपाणी व मुलांचे शिक्षण होत आहे, असे त्या म्हणाल्या.

एक महिला सायकलवरून समोसे विक्री करते याची काहींनी टिंगलटवाळी केली तर अनेकांनी कौतुकही केले. मी मात्र माझ्या कुटुंबाचे पोट यावर चालत असल्याने चांगल्या वाईट सगळ्या बाबींकडे दुर्लक्ष करत प्रामाणिकपणे काम करत आहे. कोरोनाकाळात भुकेल्यांना समोसा मिळत असल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो व उदरनिर्वाहासाठी पैसेही मिळतात.
-दिनेश्वरी (पिंकी) मोरेश्वर जांभूळकर

(woman selling samosa on roads in Nagpur during lockdown)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT