Women Dead Body found in the well 
नागपूर

विहिरीत आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात...

अनिल कांबळे

नागपूर : सोनेगाव परिसरात राहणाऱ्या एका महिलचा मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळला. यामुळे खळबळ माजली. बघ्यांनी गर्दी केली होती. ही आत्महत्या की घातपात, अशी चर्चा सुरू होती.

ही घटना शुक्रवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास घडली. रेखा सुरेंद्र कश्‍यप (45, रा. स्वागत सोसायटी, एनआयटी गार्डन तलावाच्या बाजूला) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा कश्‍यप यांचे पती मजुरी करतात. तिला दोन मुले आहेत. त्यापैकी मुलीचे लग्न झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी रेखा यांचा मृतदेह घराजवळील विहिरीच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. ही घटना परिसरात माहिती होताच एकच खळबळ माजली. नागरिकांनी सोनेगाव पोलिसांना याची सूचना केली.

पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविला. रेखा यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. हा घातपात आहे की रेखा यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, याबाबत अद्याप खुलासा झाला नसून, पोलिस या दिशेने तपास करीत आहेत. या प्रकरणी मुलगा अजय सुरेंद्र कश्‍यप (30) यांनी दिलेल्या सूचनेवरून पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Ganeshotsav Rules: गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल; वाघोली पोलिसांचा कडक इशारा

Ayurvedic Remedies for Arthritis: संधिवातामुळे चालणंही कठीण होतंय? मग 'हे' ३ आयुर्वेदिक उपाय देतील सांध्यांना आराम!

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT