International women's powerlifter Roshni Rinke trying government job for eight years 
नागपूर

व्यथा खेळाडूंची : नोकरीसाठी आठ वर्षांपासून शासनदरबारी खेटे!

नरेंद्र चोरे

नागपूर : जेमतेम एक महिन्याची असताना वडील सोडून गेले. दोन वर्षांची असताना पोलिओमुळे उजवा पाय लुळा पडला. त्या परिस्थितीत गवताच्या झोपडीत राहणाऱ्या आईने हातमजुरी करून आपल्या एकुलत्या एक अपंग मुलीला लहानाचे मोठे केले. नातेवाईक व समाजातील भल्या व्यक्‍तींच्या मदतीने तिला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनविले. देशभरातील विविध स्पर्धांमध्ये पदके जिंकून, प्रतिष्ठेचा एकलव्य पुरस्कार मिळवून आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करूनही राज्य शासन तिला नोकरीसाठी आठ वर्षांपासून झुलवत आहे.

ही कहाणी आहे आंतरराष्ट्रीय महिला पॉवरलिफ्टर रोशनी रिनकेची. कुही तालुक्‍यातील शिवनी गावात यशोदेच्या पोटी जन्माला आलेली रोशनी अवघ्या एक महिन्याची असताना तिच्या वडिलांचे (प्रकाश रिनके) निधन झाले. आई रोशनीला घेऊन नागपुरातील भावाच्या आश्रयाने आली. पण, दोन वर्षांची असताना रोशनीला ताप आला. त्यात पोलिओ होऊन उजवा पाय निकामी झाला.

खेळाची आवड असल्याने रोशनी सुरुवातीला ऍथलेटिक्‍समध्ये आली. त्यानंतर अर्जुन पुरस्कार विजेते पॅरालिम्पिकपटू विजय मुनिश्‍वर यांच्यामुळे ती पॉवरलिफ्टिंगमध्ये आली. हलाखीच्या परिस्थितीमुळे तिला सकस आहार घेण्यात अनेक अडचणी येत होत्या. अशावेळी मनोज बाळबुद्धे व नरेंद्र इंगळे यांनी मदत करून तिच्या पंखांना बळ दिले.

35 वर्षीय रोशनीने गेल्या दहा- बारा वर्षांत अनेक स्पर्धा गाजविल्या. वर्ल्ड चॅम्पियनशिप (दुबई), आशियाई चॅम्पियनशिप (मलेशिया), आयवाज वर्ल्ड गेम्स (बंगळूर) आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (दिल्ली) या चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्त्व केले. आयवाज गेम्समध्ये तिचे ब्रॉंझपदक थोडक्‍यात हुकले.

रोशनीने पॉवरलिफ्टिंगमधील प्रतिष्ठेचा "स्ट्रॉंग वूमन ऑफ इंडिया' किताब पटकाविला. तब्बल पाचवेळा स्वत:चाच विक्रम मोडीत काढण्याचा अनोखा पराक्रम तिने केला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 2012-13 मध्ये रोशनीला राज्य शासनाने प्रतिष्ठेच्या एकलव्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले.

त्याचवर्षी तिने सहकारी खेळाडू संदीप गवईसोबत "क' वर्गातील नोकरीसाठी शासनाकडे अर्ज केला. दुर्दैवाने आठ वर्षे लोटूनही अद्‌याप तिच्या अर्जावर शासनाने विचार केलेला नाही. "माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असून, आजच्या घडीला मला नोकरीची नितांत गरज आहे' अशी विनवणी पदवीधर असलेल्या रोशनीने "सकाळ'मार्फत शासनाकडे केली आहे.

रोशनीचे पती (मिथून धांडे) दोन्ही पायांनी अपंग आहेत. चिंधी व्यवसाय करून ते पत्नी व मुलाचे पालनपोषण करीत आहेत. मात्र लॉकडाउनमुळे सध्या धंदा बंद असल्याने रोशनीच्या परिवाराचे दोन वेळच्या खाण्याचे वांधे आहेत.

नोकरीची हकदार
रोशनीने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. आमची एकेकाळची ती "चॅम्पियन' खेळाडू होती. नशिबाने साथ दिली असती तर ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी मेडलही जिंकू शकली असती. रोशनीची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी बघता ती नोकरीची निश्‍चितच हकदार आहे.
-विजय मुनिश्‍वर, रोशनीचे प्रशिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarachand Agarwal CA Final: मानलं बॉस...! ७१व्या वर्षी पास करून दाखवली कठीण 'CA' परीक्षा अन् स्वप्न पूर्ण केलंच

ENG-U19 vs IND-U19: भारतीय कर्णधाराचे इंग्लंडमध्ये दमदार शतक; १४ चौकार अन् २ षटकारांसह इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT