Wonder boy from nagpur crossed 102 stairs by doing Chakrasan
Wonder boy from nagpur crossed 102 stairs by doing Chakrasan  
नागपूर

वंडरबॉय राघवचा भीमपराक्रम! चक्रासन अवस्थेत सर केल्या १०२ पायऱ्या; दुसऱ्या जागतिक विक्रमाची नोंद

योगेश बरवड

नागपूर ः चक्रासन भल्याभल्यांना घाम फोडणारा आसनप्रकार. पण, केवळ सहा वर्षांच्या राघवने सरसर १०२ पायऱ्या सरकरण्याचा भीमपराक्रम करून दाखवीला. तो देखील अवघ्या १ मिनीट ५१ सेकंदात. या कामगिरीसह त्याने दुसऱ्या जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. यापूर्वी केवळ पाच वर्षाचा अतनाना त्याने न थकता केवळ एका मिनिटात तब्बल १२५ टाईल्स फोडून जागतिक विक्रमाची नोंद केली होती. 

सिव्हिल लाइन्सच्या भवन्सचा पहिल्या वर्गाचा विद्यार्थी असणारा राघव भांगडे याने वयाच्या अडीच वर्षांपासून योगा व कराट्यांचे प्रशिक्षण सुरू केले. त्यावेळी राघवचे वय लक्षात घेत त्याला विदर्भ कराटे असोसिएशनचे अध्यक्ष व कराटे प्रशिक्षक विजच घिचारे यांनी प्रवेश नाकारला होता. मात्र, पालकांच्या आग्रहास्तव त्यानी राघवला प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शविली. 

घिचारे यांनी अल्पावधितच त्याच्यातील विशेष गुण ओळखू मेहनत घेणे सुरू केले. त्यांच्या मार्गदर्शनातच धडे गिरवित राघव अल्पवधीत कराटे आणि योगा या दोन्ही पाकारात निपुण झाला. चक्रासन प्रकार तसा अवघड प्रकार पण, राघवने या आसन प्रकारात पायऱ्या चढण्याचे कसब आत्मसात केले. हळूहळू वेग वाढविला. आज त्याने आपल्या घरी आपल्या घरीच केवळ १ मिनीट ५१ सेकंदांमध्ये १०२ पायऱ्या सर केल्या. 

येवढ्या कमी वेळेत येवढी उंची सर करणारा तो पहिलाच ठरला आहे. यापूर्वी कुणीही हे धाडस करू शकले नाही. राघवचे कौतूक करण्यासाठी पोलिसा उपायुक्त गजानन राजमाने, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, विद्यापीठाचे क्रीडा संचालक शरद सूर्यवंशी, डॉ. धनंजय वेळूकर, आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे प्रामुख्याने उपस्थित होते.

रागवने गतवर्षी एका मिनिटात १२५ टाइल्स फोडून साऱ्यांनाच आश्चर्यचकीत केले होते. त्यापूर्वी ४ वर्षांचा असताना त्याने भूतान येथील कराटे स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत सुवर्ण व कांस्य पदकाची कमाई केली होती. त्याचे वडील साहिल भांगडे व आई तृप्ती दोघेही पेशाने वकिल आहेत. दोघेही नेहमीत मुलांना प्रोत्साहित करीत असतात. राघवचा मोठा भाऊ दर्शसुद्धा उत्कृष्ठ जलतरणपटू आहे. जानेवारीत दर्शने अरबी समुद्रातीला लाटांशी झुंज देत ३ किमीपर्यंतचे अंतर यशस्वीरित्या कापले.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT