jupiter 
नागपूर

सोमवारी लुटा खगोलशास्त्रीय घटनेचा आनंद; सूर्य, पृथ्वी आणि गुरू हे तिन्ही ग्रह येणार सरळ रेषेत

राजेश रामपूरकर

नागपूर : सूर्य, पृथ्वी आणि गुरू हे तिन्ही ग्रह एका सरळ रेषेत येणार असल्याने सोमवारी 13 जुलै रोजी सूर्यास्तापासून गुरूचे तेजस्वी दर्शन घडणार आहे. 

प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्र खगोलीय घटनांवर आधारित आहे आणि टेलिस्कोप विकसीत होण्यापूर्वीपासूनच ब्रह्मांडातील खगोलीय घटनांचा वेध प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी घेतला आहे. 13 जुलै रोजी पूर्व दिशेला क्षितिजावर अद्भूत अंतराळीय घटनेचा साक्षात्कार सर्वसामान्यांना घेता येणार आहे, असे आंतरारष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले. 

13 जुलै रोजी गुरू धनू राशीत 28 अंश 22 कला व 11 विकलावर तर त्याच सुमारास सूर्य मिथून राशीत 25 अंश 55 कला व 44 विकलावर राहणार आहे. याचा अर्थ पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य तर विरूद्ध बाजूला गुरू अशी स्थिती असणार आहे. त्यामुळे, सूर्यास्ताबरोबरच पूर्व क्षितिजावर गुरूचे दर्शन होईल. सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून 40 मिनिटांनी होणार आहे. यावेळी गुरू सूर्याच्या अगदी समोर आलेला असल्यामुळे पृथ्वीवरून जो गुरूचा भाग दिसतो, त्यावर सूर्याचा प्रकाश पडेल आणि त्यामुळे गुरू प्रकाशमान व तेजस्वी दिसेल. 

हेही वाचा - तुकाराम मुंढे राजाश्रयामुळेच शिरजोर

गुरू जसजसा वर येईल तसतसा तो अधिक चमकदार होणार आहे. ही ग्रहस्थिती सर्वसामान्यांना सहज डोळ्यांनी अनुभवता येणार असून, टेलिस्कोपचा आधार घेतला तर गुरूवरील आभाळ व गुरूचे चंद्रही बघता येणार आहे. गुरूचे ज्योतिषशास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे, ज्योतिषशास्त्रज्ञांसाठी ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. गुरूला देवांचा गुरू म्हटले जाते.

त्यामुळे, गुरूचे दर्शन घेणे अत्यंत लाभदायक समजले जाते. ज्यांचा गुरू प्रबळ असेल किंवा ज्यांना गुरूबळ नाही, त्यांनी या घटनेचा साक्षात्कार घेऊन ओम बृं बृहस्पतये नम: हा मंत्र वेळा जपण्याचे आवाहन डॉ. अनिल वैद्य यांनी केले आहे. ही घटना रात्रभर उघड्या डोळ्यांनी बघता येणार असल्याने खगोलशास्त्रीय घटनेचा आनंद घेता येणार आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT