The work of the hall is in the final stages at metro stattion 
नागपूर

मेट्रो स्टेशनवरही ‘बॅंड, बाजा, बारात'!

राजेश प्रायकर

नागपूर : महामेट्रो एअरपोर्ट साउथ मेट्रो स्टेशनवर साडेचारशे लोकांची क्षमता असलेले सभागृह तयार करीत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे सभागृह लग्नासह इतर कार्यक्रमासाठी भाड्याने देण्यात येणार आहे. त्यामुळे वऱ्हाडी मंडळीला मेट्रोतून प्रवास करीत सभागृहात पोहोचणे सहज शक्य होणार आहे.

वर्धा मार्गावरील एयरपोर्ट साउथ मेट्रो स्टेशनवरील पहिल्या मजल्यावरील उपलब्ध जागेवर कार्यक्रमासाठी सभागृह तयार करण्यात येत आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी शुक्रवारी सभागृहाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यांनी शिल्लक कामे लवकर उरकण्याचे निर्देश दिले. या सभागृहाचा लग्न समारंभासाठीच नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रमासाठीही वापर करता येणार आहे.

चारशे ते साडेचारशे नागरिकांची क्षमता असलेले हे सभागृह वातानुकूलित आहे. या जेवणासाठीही स्वतंत्र व्यवस्था असून किचनकडे जाणारा मार्ग वेगळा आहे. लिफ्टसह एस्केलेटर्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे. व्हीडिओ डिस्प्ले स्क्रिनचीही व्यवस्था करण्यात आली आहे. महामेट्रोने प्रवासी तिकिटातून मिळणाऱ्या उत्पन्नासोबत इतर मार्गाने महसूल मिळविण्यावर भर दिला आहे.  या सभागृहाचे काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश नुकतेच दीक्षित यांनी दिले आहे.

विरंगुळा केंद्राची पाहणी 
एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथे सेवाग्राम येथील बापू कुटीची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. २८ ऑक्टोबरपासून एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र खुले झाले. या केंद्राची पाहणीही डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी केली. नागरिकांनी या विरंगुळा केंद्राचा जास्तीत जास्ती करावा असे आवाहन त्यांनी केले. येथे महात्मा गांधीवरील पुस्तके उपलब्ध असून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेशन परिसरात वॉकींग ट्रॅक, मेट्रोपिलरवरील व्हर्टीकल गार्डन, वाचनालय आदी सुविधा आहेत.

(संपादन : प्रशांत राॅय)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्प यांचे एक वक्तव्य आणि शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1400 अंकांनी खाली; Indigo चे शेअर्स चर्चेत

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

SCROLL FOR NEXT