workers attacked their boss in Nagpur Crime News  
नागपूर

दारू पिऊन आरामाच्या तयारीत असताना 'त्यानं' काढलं रात्रपाळीचं फर्मान अन् घडला मृत्यूचा भयंकर थरार  

योगेश बरवड

नागपूर ः रात्रपाळीत ड्युटी लावण्याच्या वादातून मजुरांनी चाकूने भोसकून मोकादमाची हत्या केली. एमआयडीसी हद्दीत गुरुवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली.

सम्हारू अवधू हरिजन (६०) रा. रुद्रपूर, जिल्हा देवरिया उत्तरप्रदेश असे मृताचे तर दिनेशकुमार लाला (२३), बजरंगी लालचंदप्रसाद गौतम (२१) आणि सुशीलकुमार दीपचंद गौतम (१९) तिघेही रा. मोहम्मदपूर, जिल्हा शहाजानगूर उत्तर प्रदेश अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व आरोपी मेट्रोच्या कामावर केबल टाकण्याची व अन्य कामे करायचे. आरोपी मजूर म्हणून कामाला आहेत तर मृतक कामगारांची ड्युटी लावायचा. 

सध्या गांधीबाग परिसरात ते कामाला होते आणि काम आटोपल्यावर सोबतच रहायचे. आरोपींनी दिवसपाळीत काम केले. श्रमपरिहार त्यांनी दारू प्यायले. जेवण करून आराम करण्याच्या बेतात असताना रात्री आठच्या सुमारास सम्हारू याने रात्रपाळीतही कामावर जाण्याचे फर्मान सोडले. यामुळे तिन्ही आरोपी चिडले. त्यांनी दिवसभराच्या कामाने थकल्याचे कारण पुढे करीत कामावर जाण्यास नकार दिला. पण, सम्हारू याने कामावर जावेच लागेल, असा हट्ट धरत शिवीगाळ सुरू केली. 

यामुळे आरोपी अधिकच चिडले. त्यांनी सम्हारूला बेदम मारहाण केली. दिनेशकुमार याने संतापाच्या भरात जवळचा चाकू काढून सम्हारूच्या छातीवर वार केला. सम्हारू रक्ताच्या थारोळ्यात कोसळून तिथेच गतप्राण झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला. 

आरोपी पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी मागोवा काढला असता ते जबलपूरला पळून जात असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT