नागपूर

‘ब्लॅकी’ बनली ‘हिरोईन’; आदित्य राऊतच्या आगळ्या छंदाची यशोगाथा

नीलेश डाखोरे

नागपूर : नागपुरातील अयोध्यानगरात आदित्य राऊत राहतो. त्याला मांजरी पाळण्याचा छंद आहे. आदित्यच्या पाळीव मांजरीत बहुतांश मांजरी पर्शियन जातीच्या आहेत. त्यातील एक काळीशार मांजर बाहुबलीच्या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. आदित्य अगोदर या मांजरीला ‘ब्लॅकी’ या नावाने हाक मारायचा. मात्र, वेबसिरीजमध्ये निवड झाल्यापासून तिचे नाव त्याने ‘हिरोईन’ असेच ठेवले आहे.

वेबसिरीजसाठी ‘हिरोईन’ची निवड होण्याचा किस्साही तितकाच खास आहे. आदित्यला एके दिवशी पुण्यावरून फोन आला. त्यांना शूटिंगसाठी एक काळी मांजर हवी आहे. त्यांच्या निकषात आदित्यची ‘ब्लॅकी’ बसत होती. तो तिला घेऊन पुण्याला गेला. तेथून त्याला पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या भोर येथे नेण्यात आले.

भोर येथील ३५० वर्षे जुन्या ऐतिहासिक पेशवे वाड्यात वेबसिरीजचे शूटिंग सुरू होते. तेथे ‘ब्लॅकी’सोबत आणखी २२ मांजरी होत्या. त्यातून आदित्यच्या ‘ब्लॅकी’ची निवड झाली. ‘ब्लॅकी’च्या निवडीनंतर आदित्याला माहीत झाले की, ही वेबसिरीज बाहुबलीवर आहे व त्याचेच शूटिंग तेथे सुरू आहे. २७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या काळात वेबसिरीजचे चित्रीकरण करण्यात आले. त्यात महाराणीच्या शेजारी बसलेली मांजर हीच आदित्यची ‘ब्लॅकी’ आहे.

आदित्यकडे असलेल्या पाळीव मांजरींची संख्या १६ आहेत. त्यासोबत होस्टेलमध्ये येणाऱ्या मांजरीही त्याच्या ‘कॅट होम’मध्ये आहेत. मांजर पाळणाऱ्यांना बाहेरगावी जायचे असेल तर त्यांच्या मांजरींना ठेवण्यासाठी त्याने होस्टेल उघडून छोटा व्यवसायच सुरू केला आहे.

दोन रंगांचे दोन डोळे

आदित्यच्या मांजर-कुटुंबात एक मांजर तर अनोखी आहे. शक्यतोवर कुणाही प्राण्याच्या दोन्ही डोळ्यांचा रंग सारखा असतो. परंतु, आदित्यच्या या मांजरीचे दोन्ही डोळ्यांचा रंग वेगवेगळा आहे. एका डोळ्याचा निळा तर दुसऱ्याचा घारा आहे.

एकाच वेळी नऊ पिल्ले

सामान्यतः मांजरीला तीन-चार पिल्ले होतात. परंतु, काही वेळा पाच ते सात पिल्लेही झाल्याचे दिसून आले. पण ही संख्याही अतिशय अपवादात्मक स्थितीत आहे. सातपेक्षा अधिक पिल्ले झाल्याची नोंद नाही. परंतु, आदित्यकडील एका मांजरीला चक्क नऊ पिल्ले झाली होती.

कुत्रे, मांजर तसेच पोपटासारखे पक्षी हौशीने पाळणारे अनेकजण असतात. त्यांना असे चांगले प्राणी हवे असतात. त्यांना असे चांगले जातिवंत प्राणी पुरविण्याचा चांगला व्यवसाय अनेकांना करता येऊ शकतो. केवळ १० हजार गुंतवणूक करूनही हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. मात्र, प्राण्यांचे चांगले संगोपन करता आले पाहिजे.
- आदित्य राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT