world record maker raghav bhangde preparing for another record of walking 100 m on hand india book of records nagpur
world record maker raghav bhangde preparing for another record of walking 100 m on hand india book of records nagpur Sakal
नागपूर

Raghav Bhangde : विश्वविक्रमवीर राघव दोन्ही हातांवर शंभर मीटर चालणार!

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News: अत्यंत कमी वयात आतापर्यंत तीन विश्वविक्रम करणारा नागपूरचा चिमुकला कराटेपटू राघव भांगडे हा आणखी एक विक्रम करणार आहे. यावेळी तो दोन्ही हातांवर शंभर मीटर चालून ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’सह ‘गिनीस बुक’मध्येही नाव नोंदविण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती, विदर्भ कराटे असोसिएशनचे अध्यक्ष व राघवचे प्रशिक्षक विजय घिचारे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

हा अनोखा इव्हेंट येत्या रविवारी (ता. १०) सकाळी सात वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर होणार आहे. सिव्हिल लाइन्स येथील भवन्स मध्ये चौथ्या वर्गात शिकणारा राघव कराटे या खेळात ब्लॅक बेल्ट आहे.

मी विक्रमासाठी सज्ज असून, कोणत्याही परिस्थितीत हा पराक्रम करणारच, असा विश्वास त्याने बोलून दाखविला. असा पराक्रम करणारा राघव त्याच्या वयोगटात पहिलाच मुलगा राहणार आहे. या इव्हेंटचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार असून, इंडिया बुकची टीम लाइव्ह पाहणार आहे.

याशिवाय डीसीपी अर्चित चांडक, विद्यापीठाचे क्रीडा विभागप्रमुख डॉ. शरद सूर्यवंशी, डॉ. धनंजय वेळूकर, डॉ. माधवी मार्डीकर, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष अंबुलकर व धनश्री लेकुरवाळे यांचा समावेश असलेली पंच कमिटीही (ज्युरी) राहणार आहे.

राघवचा पराक्रम पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, आमदार परिणय फुके, वेद वासुदेव प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजितदादा तुकदेव व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष ॲड. परिजात पांडे उपस्थित राहणार आहेत. पत्रपरिषदेला संजू शर्मा, राघवचे वडील साहिल भांगडे व आई तृप्ती भांगडे उपस्थित होते.

वंडरबॉयची ‘वंडरफुल’ कामगिरी

वंडरबॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नऊ वर्षीय राघवने डिसेंबर २०२१ मध्ये अवघ्या एक मिनिट १३ सेकंदात उलट्या हाताने पाच मजली इमारतीच्या तब्बल १२० पायऱ्या उतरून चक्रासनमध्ये नव्या विश्वविक्रमाची नोंद केली होती. शिवाय २०१९ मध्ये त्याने एका मिनिटात १२५ टाईल्स फोडण्याचाही पराक्रम केलेला आहे. आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतही त्याने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20 World Cup Anthem : आयसीसीने टी 20 वर्ल्डकपचे नवे अँथम साँग केले प्रसिद्ध; ग्रॅमी पुरस्कार प्राप्त बाल्फेंची आहे निर्मिती

Jalgaon Crime News : सराफ बाजार दरोडा! तिघांना 7 दिवस कोठडी; दोघा भावंडांनाही अटक

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

Dombivli MIDC Blast : आचारसंहिता होती अन्यथा...डोबिंवलीतील MIDC हलवण्याबाबत उद्योगमंत्र्यांचं मोठं विधान

Latest Marathi News Live Update: छत्तीसगडमध्ये सुरक्षा जवानांसोबत झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार

SCROLL FOR NEXT