सार्वजनिक आरोग्य विभाग sakal
नागपूर

आरोग्यभरती घोळ : नागपुरात चुकीचा पेपर, उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर घातला गोंधळ

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी भोंगळ कारभारामुळे आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला होता. आज हीच परीक्षा होत असून आरोग्य विभागातील (health department exam) सावळा गोंधळ कायम असल्याचे चित्र आहे. नागपुरातील गोंविदराव वंजारी महाविद्यालायत (govindrao vanjari college nagpur) परीक्षार्थींना चुकीचा पेपर देण्यात आला. तसेच काही परीक्षार्थींना उशिरा पेपर देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला.

गेल्या महिन्यात ही आरोग्य विभागाची परीक्षा होती. त्यावेळी परीक्षार्थींना चुकीचे प्रवेशपत्र, परीक्षा केंद्राचे गोंधळ, उत्तर प्रदेशापासून चीन वुहाण प्रांतातील पिनकोड या प्रवेशपत्रावर देण्यात आले होते. यासंबंधी अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या. तरीही अनेक विद्यार्थी पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. पण, परीक्षेच्या काही तासांपूर्वी ही परीक्षा रद्द करण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला होता. अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी स्वतः राजेश टोपे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

गेल्या महिन्यातील गोंधळानंतर आज ही परीक्षा होत आहे. मात्र, आज देखील परीक्षेत गोंधळ असून अनेक विदर्भातील विद्यार्थ्यांना मुंबई आणि पुण्याचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. तसेच अनेक परीक्षा केंद्रावर परीक्षेची वेळ होऊन देखील त्यांना पेपर देण्यात आले. नागपुरातील गोंविदराव वंजारी महाविद्यालयात देखील आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना चुकीचा पेपर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्यानंतर हा तुमचा पेपर नाही, दुसरा पेपर देऊ असे सांगण्यात आले. तसेच काही विद्यार्थ्यांना उशिरा पेपर देण्यात आले, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Live Update : CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

Kikvi Project Deal : किकवी प्रकल्प व्यवहाराच्या कोणत्याही चौकशीस तयार माजी संचालकांचा खुलासा; करार पारदर्शी

SCROLL FOR NEXT