yavatmal news  sakal
नागपूर

Yavatmal Crime : सज्जनगड खूनप्रकरण; पैशांसाठी चौघांकडून घडला क्रूर गुन्हा

दोघांचा जीव घेऊन हाती बनावट दागिने.

सकाळ वृत्तसेवा

Yavatmal News - जुगाराच्या खेळात झालेले कर्ज फेडण्यासाठी आपल्या साथीदारांना घेत दोघांचा खून करून दागिन्यांसह रोख रक्कमेवर हात मारला. सज्जनगड (तळेगाव भारी) येथील दुहेरी खून प्रकरणातील चार आरोपींकडून २६ हजार ३४० हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह दागिने जप्त करण्यात आलेत. मात्र, मारेकऱ्यांनी चोरी केलेले दागिने बनावट निघाले.

लक्ष्मण चंपतराव शेंडे (वय ९०) व पुष्पा बापूराव होले (वय ७६) अशी मृतांची नावे आहेत. दोघांचाही सज्जनगड येथे गळा आवळून खून करण्यात आला होता. अवघ्या सहा तासांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा उलगडा करीत चौघांना अटक केली.

न्यायालयाने मारेकऱ्यांना चार सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. लक्ष्मण शेंडे यांना महाराज म्हणून पंचक्रोशीत ओळखले जात होते. ते जडीबुटी देऊन दुर्धर आजार बरे करीत असल्याने त्यांच्याकडे नेहमीच गर्दी राहायची. जुगारामुळे आरोपी आशीष याच्यावर सहा ते सात लाख रुपयांचे कर्ज झाले होते.

महाराजांकडे नेहमी पैसा असतो. सोनेही असल्याची माहिती त्याला मिळाली. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी पैसे मिळतील, या उद्देशाने आपल्या साथीदारांच्या मदतीने महाराजासह वृद्धेचा खून केला. मारेकऱ्यांनी नेमका किती मुद्देमाल लांबविला, याची उत्सुकता सर्वांनाच होती.

पोलिस कोठडीत असलेल्या आरोपींनी कार्ली नाल्याजवळ लपवून ठेवलेली रोकड व दागिने काढून पोलिसांना दिले. पोलिसांनी रोकड मोजली असता २६ हजार ३४० रुपयांचा हिशोब लागला. जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची सराफाकडे नेऊन तपासणी करण्यात आली. सदर दागिने सोन्याचे नव्हे तर, बनावट असल्याचे आढळून आले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT