युवा कीर्तनकार व कवी अविनाश भारती  sakal
नागपूर

Yin Summer youth summit 23 : ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करा;युवा कीर्तनकार अविनाश भारती

कोवळ्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ लिहिला व छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले.

सकाळ वृत्तसेवा

सोळावे वर्ष धोक्याचे म्हटले जात असले तरी, याच कोवळ्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथ लिहिला व छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. त्यामुळे आयुष्यात काहीतरी चांगले करायचे असेल तर कमी वयातच ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करा, असा सल्ला मराठवाडा येथील विविध पुरस्कारविजेते युवा कीर्तनकार व कवी अविनाश भारती यांनी तरुणाईला दिला.

तरुणांशी संवाद साधताना अविनाश भारती म्हणाले, कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी वय महत्वाचे नसते. शिक्षण शिकत असतानाही मोठ्या गोष्टी करू शकता. अनेकांनी ते सिद्ध करून दाखविले आहे. मुळात तुम्ही जे काही करता ते अगदी मनापासून करा. दुसरे काय करतात किंवा काय म्हणतात, त्याकडे लक्ष देऊ नका.

तुमचे अंतर्मन आणि आत्मा काय म्हणतो ते ऐकून आयुष्याचा मार्ग निवडा. नक्कीच यश मिळेल. तरुणांनी मनाशी पक्का निर्धार, दृढनिश्चय केला तर ते काहीही करू शकतात, असे ते म्हणाले. आयुष्यात समस्या, अडचणी व नकारात्मक विचार हे येणारच. मात्र त्याला घाबरून न जाता अडचणींवर मात करून कसे पुढे जाता येईल, याचा विचार करा, असे भारती यावेळी म्हणाले.

भविष्यात प्रमुख पाहुणा बनून या

यिन समिटमध्ये तुम्ही सहभागी होण्यासाठी दुरदुरून विद्यार्थी म्हणून येथे आला आहात. दोन दिवसांत प्रेक्षकांमध्ये बसून नक्कीच खूप काही शिकला असणार. मात्र तुम्ही असे कार्य करा, जेणेकरून भविष्यात या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा बनून याल. हे मला पाहायचे आहे. तोच अशा कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे भारती यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT