The young man commits suicide 
नागपूर

अपमान सहन न झाल्याने केले असे...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर: घरभाडेकरू महिलेसोबत पाणी टाकण्यावरून घरमालक युवकासोबत वाद झाला. या वादानंतर भाडेकरू महिलेने दोन मित्रांना बोलवून युवकाला मारहाण केली. हा अपमान सहन न झाल्यामुळे घरमालक युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुभम रामाजी रामटेके (वय 24, रा. प्रजापतीनगर) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामाजी तनसाराम रामटेके (वय 55) यांचे प्रजापतीनगरात दुमजली घर आहे. त्यांना दोन मुले असून दोन्ही डायव्हर आहेत. त्यांनी वरचा माळा मोना (वय 34) यांना भाड्याने दिला होता. गेल्या सहा वर्षांपासून मोना तेथे राहतात. त्यांचे पती टक ड्रायव्हर असून त्यांना दोन मुली आहेत. शुभम दारुडा असून ट्रॅव्हल्स चालवतो. रामटेके यांचे मोना यांच्यासोबत कौटुंबिक संबंध असल्याने शुभम नेहमी वर येत होता. 31 डिसेंबर 2019 ला मोना आणि शुभमचे पाणी टाकण्यावरून वाद झाला. त्याने वरच्या माळ्यावर जाऊन मोना यांना शिवीगाळ केली.

मोना यांनी दरवाजा लावून घेतला असता त्याने बाहेर ठेवलेल्या खुर्च्यांची तोडफोड केली तर रॉडने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. दारूच्या नशेत असलेल्या शुभमचा अवतार पाहून मोना यांनी आपल्या दोन मित्रांना फोन केला आणि घरी बोलावून घेतले. त्या दोन्ही युवकांनी शुभमला जबर मारहाण केली आणि निघून गेले. मोनाने 100 नंबरवर डायल करून पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. बिट अंमलदारांनी घटनास्थळाला भेट दिली. शुभमला वाठोडा पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले.

शुभमविरुद्ध केली कारवाई


शुभमला पोलिसांनी उपदेशाचे डोज पाजल्यानंतर मोना यांनी ठाण्यात तक्रार दिली. वाठोडा पोलिसांनी त्याच्याविरूद्ध (एनसी) 107 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली. पाच तासांनंतर शुभमला पोलिसांनी त्याच्या आईवडीलाच्या स्वाधीन केले. शुभम घरी आला आणि त्याने घरीसुद्धा भांडण केले.

रूममध्ये घेतला गळफास

शुभम रात्री जेवण न करता झोपी गेला. पहाटे उठल्यानंतर त्याला केलेल्या कृत्याचा पश्‍चाताप झाला. तसेच दोन युवकांनी सर्वांसमोर मारहाण केल्यामुळे अपमानीत झाल्यासारखे वाटले. अपमान जिव्हारी लागल्यामुळे त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आईला सकाळी शुभम गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मोना यांच्या दोन्ही मित्रांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: धाराशिव मध्ये रात्रभर जोरदार पाऊस, तेरणा नदीला पुराचा धोका

SCROLL FOR NEXT