The young man left BMW to pursue a career in design 
नागपूर

‘बच्चा काबील बनो कामयाबी झक मारके पिछे भागेगी’; तरुणाने ‘बीएमडब्ल्यू’ सोडून करिअर केले डिझाइन

मंगेश गोमासे

नागपूर : हातात जर्मनीतील ‘बीएमडब्ल्यू’ या कंपनीची चावी असताना कोणी मागे बघणार नाही. मात्र, वेगळी वाट चोखाळणाऱ्यांचा नादच खुळा असतो. ‘बच्चा काबील बनो कामयाबी झक मारके पिछे भागेगी’ या ‘थ्री इडियट्स’मधील संवादाप्रमाणे एका तरुण अभियंत्याने विदेशात चाकरी करण्यापेक्षा स्वतःची करिअर इव्हेंट कंपनी स्थापन करून डिझाइन केले.

चांगल्या महाविद्यालयात शिकून चांगल्या पगाराची नोकरी मिळविण्याची बहुतांश विद्यार्थ्यांची इच्छा असते. मात्र, आपल्या आवडीनुसार करिअर करणारे मोजकेच असतात. जे. डी. अभियांत्रिकी महाविद्यालयातून राहुल वाघ याने २०१८ साली यांत्रिकी (मेकॅनिकल) अभियांत्रिकीची पदवी मिळविली. पदवी पूर्ण केल्यावर राहुल याला त्याच्या सराकडून जर्मनी येथील ‘बीएमडब्ल्यू’ या कंपनीमध्ये डिझाइनर म्हणून ‘अप्लाय’ करण्यास सांगितले. मात्र, त्याने त्यास नकार देत स्वतःच्या आवडीनुसार इव्हेंट कंपनी तयार करण्याचे ठरविले.

त्यानुसार २०१९ साली राहुलने ‘राका’स ग्लोकल फर्म’ नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून त्याने याच वर्षी सोशल इव्हेंट केला. त्यातून मिळालेल्या प्रेरणेने त्याने जोमाने कामास सुरुवात केली. आज आपल्या मित्रांना एकत्र करीत चांगल्या पद्धतीने राहुल इव्हेंट कंपनी सांभाळतो आहे.

विशेष म्हणजे, या इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून राहुलने ‘स्टॅण्डअप कॉमेडी’ आणि ‘पोएट्री शो’चे यशस्वी आयोजन केले आहे. याशिवाय सध्या तो एका लर्निंग ॲपमध्ये ‘बिझनेस असोसिएट’ म्हणूनही काम करतो आहे. त्याचा निर्णय तरुणांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.

येणाऱ्या काळात भरभराट होईल
अभियांत्रिकी पदवी घेतली; पण अगोदरपासून या क्षेत्रात करिअर करायचे नव्हते. त्यामुळे वेगळी वाट निवडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयात मित्रांची साथ लाभली. सध्या टाळेबंदीमुळे व्यवसाय बंद असला तरी येणाऱ्या काळात त्याची भरभराट होईल. 
- राहुल वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Budget: अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार! महाराष्ट्राचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस 'या' दिवशी सादर करणार

IPL 2026 : मैदानाबाहेर लढाई! Mumbai Indians गतविजेत्या RCB च्या मार्गात आडवा आला; विराट फॅन्सची वाढली चिंता

नंदिनीच्या आवाजाला झालंय तरी काय? 'लग्नानंतर होईलच प्रेम' मध्ये मृणालचा आवाज डब केलाय? प्रोमो पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न

T20 World Cup AFG vs SA : लाईव्ह सामन्यात काय घडलं? डॅनी मॉरिसन अन् महिला समालोचकाचा ‘तो’ 8 सेकंदांचा Video व्हायरल

Horscope : उद्या महासंयोग! 'या' 5 राशींसाठी 12 फेब्रुवारी ठरेल टर्निंग पॉइंट; पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा एकाच दिवशी येणार

SCROLL FOR NEXT