young man from Nagpur will ride a nonstop bike for three days 
नागपूर

नागपूरचा तरुण चालविणार तीन दिवस ‘नॉनस्टॉप’ बाईक! ७५ तासांत सहा हजार किलोमीटर

नरेंद्र चोरे

नागपूर : नागपूरचा युवा बाईक रायडर भावेश साहू ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नाव नोंदविण्याच्या उद्देशाने २८ ते ३१ मार्चपर्यंत तीन दिवस ‘नॉनस्टॉप’ बाईक चालविणार आहे. या साहसी अभियानाच्या निमित्ताने तो भारतीयांना हेल्मेट घालण्याचा व सुरक्षित वाहने चालविण्याचा सामाजिक संदेशही देणार आहे.

२४ वर्षीय भावेश सहा हजार किमी अंतराच्या सुवर्ण चतुष्कोण (गोल्डन कॉड्रीलॅटरल) नावाच्या या अभियानाची सुरवात होळीच्या पर्वावर दिल्ली येथून २८ मार्चला दुपारी १२ वाजता करणार आहे. त्यानंतर कोलकता, चेन्नई, मुंबईमार्गे दिल्ली येथे अभियानाचा समारोप होणार आहे.

हे अंतर ७५ तासांच्या आत पूर्ण करून नवा विक्रम नोंदविण्याचा त्याचा प्रयत्न आहे. या दिवसरात्र प्रवासादरम्यान तो कुठेही मुक्काम न करता तब्बल १३ राज्यांतील एकूण ८२ शहरांमधून बाईकने जाणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, खाणेपिणेही तो चालत्या बाईकवरच करणार आहे. यावेळी तो सेफ्टी गिअर, सूट व जीपीएस सिस्टीमची मदत घेणार आहे. 

‘लिम्का बुक’मध्ये नोंदणी

भावेशने या अभियानासाठी 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंदणी केली असून, अभियान पूर्ण झाल्यानंतर त्याच्या विक्रमाची नोंद होणार आहे. यापूर्वीचा ८७ तास ४२ मिनिटांचा विक्रम मुंबईच्या शोबित सरकारच्या नावावर आहे. एमबीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या भावेशने यापूर्वी भूतान, लद्दाख, नेपाळ, म्यानमार बॉर्डरपर्यंत बाईक रायडिंग केले आहे. लिम्का बुकचा विक्रम मोडण्यासह जनजागृती करणे, हाही या अभियानामागचा त्याचा उद्देश आहे.

मी यशस्वी होईल
हे अभियान माझ्यासाठी फार मोठे आव्हान असून ‘स्टॅमिना’ची परीक्षा घेणारे आहे. ही राईड निर्धारित वेळेत पूर्ण करून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नाव नोंदविण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. त्यात मी यशस्वी होईल, अशी मला खात्री आहे. 
- भावेश साहू,
बाईक रायडर

अभियानाची वैशिष्ट्ये 

  • २८ ते ३१ मार्चदरम्यान राईड 
  • दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबईमार्गे परत दिल्ली 
  • एकूण सहा हजार किमी अंतर 
  • यापूर्वी शोबित सरकारचा ८७ तास ४२ मिनिटांचा विक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Mataram Karnataka Order : काँग्रेस सरकारचा मोठा निर्णय! शासकीय कार्यक्रमात 'वंदे मातरम्'ची आता फक्त 2 कडवीच गायली जाणार; नवा आदेश जारी

Marathi News Live Updates : संसदरत्न पुरस्काराने खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

Mumbai Crime: विनातिकीट प्रवाशाची टीसीला मारहाण, धक्का देत चेहऱ्यावर बुक्का मारला अन्...; मुंबईत खळबळजनक प्रकार

Madhuri Elephant Kolhapur : माधुरी हत्तीण वनतारातून कोल्हापूरला रवाना; मठाचे वकील मनोज पाटील यांची माहिती

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

SCROLL FOR NEXT