Youth Congress demands cancellation of final year exams 
नागपूर

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा, कुणी केली ही मागणी 

मंगेश गोमासे

नागपूर : राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार परीक्षा झाल्यास विद्यार्थ्यांसह कुटुंबीयांना कोरोनाची लागण होण्याची भीती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येऊ नये अशी मागणी करीत त्याबाबतचे पत्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आले आहे. 

केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या आदेशानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने राज्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिलेत. यावर आक्षेप नोंदवीत, राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचे स्पष्ट केले. देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, येत्या नोव्हेंबरपर्यंत हा उद्रेक अधिक वाढणार आहे, असा अहवाल एआयएमएसने दिला आहे. महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक रुग्ण संख्या आहे. त्यामुळे राज्य सरकारने संसर्गाचा धोका ओळखून अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 

उच्च न्यायालयात याचिका 

केंद्र सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांना परवानगी दिली आहे. त्यानुसार यूजीसीने नव्याने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करून सप्टेंबरपर्यंत परिस्थिती पाहून परीक्षा घेण्याचे जाहीर केले आहे. तसेच ऑनलाईन, ऑफलाईन असे पर्यायही दिले आहेत. मात्र, परिस्थिती धोकादायक होत असताना आणि त्यामध्ये तीन महिन्यांत सुधारणा होईल की नाही, याबाबत हमी नसताना अशा भूमिकेमुळे विद्यार्थी, पालक, परीक्षक आदींना धोका निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात युवासेनेने या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, याविरोधात आता युवक कॉंग्रेसने आंदोलनास सुरुवात केली असून, देशभरात निवेदन देण्यास सुरुवात केली आहे. 
 

पश्‍चिम नागपूर युवक कॉंग्रेसचेही निवेदन 


पश्‍चिम नागपूर युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अखिलेश राजन यांच्या नेतृत्वात नागपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी महासचिव आलोक कोंडापुरवार, नागपूर शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष तौसीफ खान, नागपूर लोकसभा युवक कॉंग्रेस सोशल मीडिया समन्वयक स्वप्निल बावनकर व पदाधिकाऱ्यांनी शिक्षक उपसंचालक अनिल पारधी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या नावाने पत्र देत, परीक्षा रद्द करणे आणि शाळा शुल्क कमी करण्याची मागणी केली. 
संपादन : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar PM Awas Yojana: ९४ कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकार; फुलंब्रीत आवास योजनेची मंजुरी पत्रे वाटप; कच्च्या घरातून पक्क्या घराकडे वाटचाल; फुलंब्रीत लाभार्थ्यांना दिलासा

Paithan Toilet Vandalism: ७० लाखांची स्वच्छतागृहे बंदच; पैठणमध्ये तोडफोडीने नागरिक संतप्त; उद्‍घाटनाआधीच स्वच्छतागृहांची मोडतोड

Mumbai Crime : मुंबई हादरली ! पतीने पत्नीला धावत्या लोकल ट्रेनखाली ढकलले, धक्कादायक कारण समोर

राज्यसभा निवडणुकीत विरोधकांची गेम, भाजपने पुरेसं संख्याबळ नसतानाही २ जागा जिंकल्या; काँग्रेसला आमदारांचा दगा, काय घडलं?

SCROLL FOR NEXT