Zilla Parishad authorities shut the mouths of the opposition Nagpur political news 
नागपूर

सत्ताधाऱ्यांनीच केली विरोधकांची कोंडी; अनुभवाच्या अभावाचा बसला फटका आणि गमावली संधी

नीलेश डोये

नागपूर : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. मात्र, त्यांना संधीचा फायदा घेता आला नाही. उलट सत्ताधाऱ्यांनीच त्यांना घेरत कोंडी केली. विरोधी पक्षनेते अनिल निदान यांना किल्ला लढवताना एक, दोन सदस्यांचीच साथ मिळाली. उलटपक्षी सत्ताधाऱ्यांमध्ये एकजूट दिसून आली.

अध्यक्ष रश्मी बर्वे यांची खऱ्या अर्थाने पहिलीच सभा होती. कुशल राजकारणीप्रमाणे त्यांनी सभा चालवली. त्यांना उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांची भक्कम साथ मिळाली. विरोधकांकडून प्रश्न उपस्थित होताच दुधाराम सव्वालाखे, अवंतिका लेकुरवाळे, शांता कुमरे, प्रवीण खापरे, नाना कंभाले आदी सदस्यांनी प्रतिप्रश्नाचा मारा करीत त्यांची घेराबंदी केली. यामुळे विरोधकांना सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी कमी मिळाली किंबहुना मिळालीच नाही.

विरोधकांकडे अनुभवी सदस्यही कमी आहेत. विरोधी पक्ष नेते अनिल निदान वगळता दुसऱ्यांना जिल्हा परिषदेचा अनुभव नाही. त्यामुळे राजेंद्र हरडे आणि काही सदस्य वगळता निदान यांना फारशी साथ मिळाली नाही.

अध्यक्ष बर्वे यांनीही राजकीय कौशल्य दाखवत विरोधी पक्षनेत्यांची अडचण करण्याचा प्रयत्न केला. उपाध्यक्ष यांनी जुन्या काळातील दाखला देत विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. बोलू देत नसल्याचे कारण पुढे करीत विरोधकांनी सभात्याग केला. मात्र, यात विरोधकांनी एक मोठी संधी गमावली.

विषय पत्रिकेपूर्वीच केला सभात्याग

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या वितरणाबाबत विरोधकांनी अनेकदा आरोप केलेत. हा विषय विषयपत्रिकेवर होता. त्यामुळे निधी खर्चाबाबतचा सर्व लेखाजोखा त्यांना घेता आला असता. परंतु, विषय पत्रिका सुरू होण्यापूर्वीच सभात्याग केला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कोडींत पकडण्याची एक मोठी संधी त्यांनी गमावली. विरोधकांकडे असलेल्या अनुभवाच्या अभावाचा फटका त्यांना बसल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा घोटाळा? सुप्रिया सुळेंच्या गंभीर आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ, आकडेवारीतील फरकावरून सरकारवर चौफेर टीका

तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय? तेजश्री प्रधानने साध्या सरळ शब्दात सांगितलं; म्हणते- इतका जवळचा एक माणूस...

Petrol Diesel Price: UPI वरील नवीन चार्जनंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार? पंप डीलर्सचा सरकारला प्रस्ताव; आज कितीला मिळतंय?

Marathi News Live Updates : कऱ्हाडला नागरी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद; पोलिस बंदोबस्तातही वाढ

Agniveer Exit Plan : अग्निवीरांसाठी खूशखबर! 4 वर्षांनंतर नोकरीची चिंता मिटणार; सरकारकडून मोठा 'एक्झिट प्लॅन' तयार, जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT