Zilla Parishad CEO angry with department head 
नागपूर

सीईओ कुंभेजकर विभागप्रमुखांवर भडकले, म्हणाले...

नीलेश डोये

नागपूर  : गेल्या आठ महिन्यांत दोन विभागप्रमुख भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकले. विशेष म्हणजे दोन्ही अधिकारी कुंभेजकरांच्या काळात अकडले. यामुळे ते चांगलेच संतापले असून भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असे खडे बोल विभागप्रमुखांना सुनावले.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे अधिकारी अनिल वाळके यांना ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. एका कर्मचाऱ्याचा पगार १०० टक्के करण्यासाठी त्यांनी ही लाच घेतली. विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यांपासून त्याची फाईल प्रलंबित होती. 

फायलींच्या फिरण्याचा क्रम ऑनलाइन करण्याचा दावा करण्यात येत असून आठवडाभरापेक्षा जास्त काळ फाईल प्रलंबित असल्यास त्याचे स्पष्टीकरण द्यायचे आहे. विशेष म्हणजे फाईन प्रलंबित ठेवण्याच्या कारणावरून ७-८ कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ रोखण्यात आली. असे असताना फाईल आठ महिने पडून असताना आश्चर्य व्यक्त करण्यात आहे. यापूर्वी पाणी पुरवठी विभागाचे कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांना एसीबीच्या पथकाने अटक केली होती. 

दोन्ही अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कार्यालयातच अटक करण्यात आली. यामुळे जिल्हा परिषदची प्रतीमा मलिन होत आहे. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी नाराजी व्यक्त केली. विभागप्रमुखांनी भ्रष्टाचार व गैरव्यवहारावर उपदेशाचे डोजही दिले. परंतु हे डोज अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी नवीन नाही. त्यामुळे या प्रकारावर आळा घालण्यात, त्यांनी किती यश येते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
संपादन ः अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT