dead leopard 
विदर्भ

एकाजवळ मिशी, दुसऱ्याजवळ नखे; बिबट्याची शिकार  

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : वनविभागाच्या मांडवा वनपरिक्षेत्रात बिबट्याची शिकार करून त्याच्या चारही पायांचे पंजे आणि मुंडके शरीरापासून वेगळे करण्यात आले होते. ते सर्वच अवयव वनविभागाच्या हाती आले असून त्यातील एका पंजाची दोन नखे आणि मुंडक्‍यावरील मिशी बेपत्ता असल्याचे दिसून आले. वनविभागाने त्यांचा शोध घेत दोन आरोपी शिकाऱ्यांच्या घरातून ते जप्त केले आहे. 

बिबट्याच्या मृतदेहाची विल्हेवाट

बिबट्याच्या शिकारीनंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. त्या तुकड्यांचा शोध घेत प्रारंभी वनविभागाच्या वतीने तीन पंजे जप्त करण्यात आले होते. याच काळात बिबट्याचे मुंडकेही वनविभागाने जप्त केले. हे तीनही पंजे राहुल वासुदेव कासार याच्या घरातून जप्त करण्यात आले. मात्र, एक पंजा वनविभागाला मिळत नव्हता. त्याचा शोध घेतल्यानंतर तो गावातील गुड्डे दादाराव बुरघाटे याच्या घरी मिळून आला. 

मुंडके, मिशी जप्त

बिबट्याच्या सापडलेल्या अवयवांची पाहणी केली असता एका पंजाची दोन नखे गायब होती. त्या नखांचा शोध घेतला असता ती गावातील आनंद चाफले याच्या घरात सापडून आले. तर जप्त करण्यात आलेल्या मुंडक्‍यावरील मिशी गायब होती. ती मिशी आनंद कोनबा रावेकर याच्या घरातून जप्त करण्यात आली. बिबट्याच्या तोडलेल्या पंजाची नखे आणि मिशी काढण्यात आल्याने हा प्रकार नेमका कशाचा असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या दिशेने तपास करण्याची मागणी जोर धरत आहे. 

30 वर्षांपूर्वी घडली होती अशी घटना 

जिल्ह्यात बिबट्याची शिकार करून त्याच्या पायाचे पंज कापने आणि मुंडके कापून ते नेण्याची ही पहिली घटना नाही. आजपासून सुमारे 30 वर्षांपूर्वी अशीच घटना घडल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली. ही घटना कारंजा (घाडगे) तालुक्‍यातील अंभोरा वनपरिक्षेत्रात घडली होती. त्यावेळी वाघिणीची शिकार झाल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली. त्यावेळीही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ आरोपींना अटक केली होती. 

दोन्ही घटनांतील साम्य 

30 वर्षांपूर्वी घडलेल्या वाघिणीच्या शिकार प्रकरणात सर्व आरोपी अंभोरा गावातीलच होते. तसेच बिबट्याच्या शिकार प्रकरणातील या घटनेतही सर्वच आरोपी एकाच गावातील आहेत. यामुळे शिकार करून पंजे आणि मुंडके कापण्याचा प्रकार अंधश्रद्धेला खतपाणी देणारा असल्याची चर्चा आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT