गडचिरोली : येथील मुख्य चौकात हत्येचा निषेध करताना नक्षल पीडित.
गडचिरोली : येथील मुख्य चौकात हत्येचा निषेध करताना नक्षल पीडित. 
विदर्भ

नक्षलवाद्यांच्या धास्तीने गामस्थांचा ठाण्यात आश्रय

सकाळवृत्तसेवा

गडचिरोली : तीन नागरिकांच्या हत्येनंतर कसनासूर गावात दहशतीचे वातावरण असल्याने ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून कुटुंबासह ताडगाव येथील पोलिस ठाण्यात आश्रय घेतला आहे. दरम्यान मृतांवर मंगळवारी (ता. 22) रात्री ताडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. छत्तीसगडच्या सीमेलगत असलेले कसनासूर गाव वर्षभरापूर्वी 40 नक्षलवाद्यांच्या मृत्यूने चर्चेत आले होते. या घटनेमुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे नक्षलवाद्यांनी तीन गावकऱ्यांची हत्या केल्याची चर्चा आहे.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या वर्षभरात पोलिस-नक्षल चकमकीत 50 च्या वर नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याने हिंसक कारवायांत कमी आली होती. विशेषतः चकमकीत दलम कमांडर तथा जहाल माओवादी मारले गेल्याने काही दलम संपुष्टात आल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत नक्षलवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले असून जिल्ह्यात दहशत पसरविण्यासाठी हिंसक कारवाया घडवून आणल्या जात आहेत. 40 घरांची वस्ती असलेल्या कसनासूर येथील तीन गावकऱ्यांची हत्या करून त्यांनी नक्षलवाद्यांच्या मृत्यूचा बदला घेतला. यामुळे येथील गावकरी कमालीचे धास्तावले आहेत. चार ते पाच वृद्ध वगळता सर्वच ग्रामस्थ सध्या ताडगाव पोलिसांच्या आश्रयाला आहेत. नक्षलवाद्यांच्या धास्तीने नातेवाइकांना
मृतावर त्यांच्या स्वगावी अंत्यसंस्कारही करता आले नाही. सध्या पोलिस ठाणेच त्यांचा निवारा बनले असून त्यांच्या निवास व जेवणाची व्यवस्था पोलिस प्रशासनाकडून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT