Naxalites oppose Uniform Civil Code Leaflet viral scheduled tribes gadchiroli sakal
विदर्भ

Uniform Civil Code : समान नागरी कायद्याला नक्षलवाद्यांचा कडाडून विरोध; पत्रक व्हायरल

मूलनिवासींचे अस्तित्व धोक्यात; समान नागरी कायदा अनुसूचित जमातीसाठी अन्यायकारक

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : भाजप प्रणीत केंद्र सरकार आणू पाहत असलेला समान नागरी कायदा अनुसूचित जमातीच्या मूलनिवासींसाठी अन्यायकारक असल्याचा दावा माओवादी संघटनेचा दंडकारण्यातील पश्चिम सब झोनल ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याने केला आहे.

यासंदर्भात त्याचे पत्रक समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून या पत्रकाच्या माध्यमातून समान नागरी कायद्याला विरोध करण्याचे आवाहन केले आहे.

समान नागरी कायदा अनुसूचित जमातीसाठी अन्यायकारक असल्याचा दावा माओवादी संघटनेचा दंडकारण्यातील पश्चिम सब झोनल ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याने केला आहे. या कायद्याविरोधात पत्रक काढून मंगळवार (ता. ११) त्याने तीव्र निषेध नोंदवला असून आदिवासी बांधवांना एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे.

संविधानातील पाचव्या व सहाव्या अनुसूचीनुसार १९९६ मध्ये अनुसूचित जमातींसाठी पेसा कायदा अस्तित्वात आला. समान नागरी कायदा आणून संविधानाने दिलेला हा हक्क हिरावून घेण्याचा डाव केंद्र सरकार आखत असल्याचा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे.

देशात मागील काही महिन्यांपासून समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. इतराज अवस्थी यांच्या नेतृत्वाखाली २२ वे कमिशन गठित केले असून हा कायदा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अनुसूचित जमातीसाठी हा कायदा मोठा अडसर ठरणार आहे. हिंदुत्ववादी सरकार मूलनिवासींच्या अस्तित्वावर घाला घालण्याचे काम या कायद्याच्या माध्यमातून करत असल्याचा आरोप या पत्रकाद्वारे करण्यात आला आहे. मूलनिवासींनी या कायद्याविरोधात एकत्रित यावे, असे आवाहन पश्चिम सब झोनल ब्युरो प्रवक्ता श्रीनिवास याने पत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

आपल्या देशातील मूलनिवासी जनता एकीकडे मोठ्या कार्पोरेट घराण्यांशी, दुसरीकडे हिंदुत्ववादी, मनुवादींशी आपली अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी व वनांवरील आपल्या अधिकारांसाठी लढत असल्याचेही त्याने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सरकारचे संसदेत मोठं स्पष्टीकरण

Delhi Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवार गटाच्या आठ खासदारांशी भेट; मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा; राज्यात पावसाची शक्यता, पुढील ५ दिवसांचा अंदाज

Marathi News Live Updates: पुण्यातील कॅम्पमधील हॉटेलचे कुलूप तोडून दोन लाखांची रोकड लंपास

Rahul Gandhi: संसदेत येण्याचे धैर्य शहांमध्ये नाही: राहुल गांधी, विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसची सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT