Naxals attacked on man on doubt of secret teller of Police in Gadchiroli  
विदर्भ

पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी केला युवकाचा खून; गडचिरोलीच्या भामरागढमधील घटना 

मिलिंद उमरे

भामरागड(जि. गडचिरोली) : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकिला रंग चढत असताना नक्षलवाद्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून एका युवकाचा गळा चिरून खून केला.विनोद गोपीचंद मडावी (वय २३) रा. कोठी(टोला) ता. भामरागड, असे मृत युवकाचे नाव असून ही घटना आज उघडकीस आली.

 कोठी (टोला) येथे मंगळवारी रात्री ११ ते १२ वाजताच्या दरम्यान काही सशस्त्र नक्षलवादी आले. त्यांनी शस्त्राच्या धाकावर विनोद मडावी व त्याचे वडील गोपीचंद मडावी यांना जंगलात नेले. तेथे दोघांनाही बेदम मारहाण केली. त्यानंतर जखमी गोपीचंद यांना घरी जायला सांगून त्यांच्या माघारी त्यांचा मुलगा विनोद याचा गळा चिरून खून केला. 

त्याचा मृतदेह नक्षलवाद्यांनी भामरागड- कोठी मार्गावर फेकून दिला.सोबत पोलिस खबऱ्या असल्याने खून केल्याचे पत्रकही ठेवले होते. या घटनेची माहिती मिळताच कोठी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत विनोदचा मृतदेह ताब्यात घेतला. 

त्यानंतर त्याचा मृतदेह भामरागड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. घटनेचा अधिक तपास कोठी पोलिस करत आहेत. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी हा खून केला असला तरी याचा परिणाम जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांवर होणार असे दिसत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Asia crisis : महागाई वाढणार! आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीच्या दरात मोठी वाढ, युद्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसणार, जहाज वाहतुकीचा खर्च वाढला

Ashok Kharat: ५ मिनिटांत भविष्य सांगायचा ‘खेळ’ उघड! भोंदू अशोक खरातची धक्कादायक मोडस ऑप्रेंडी समोर, स्वतंत्र दोन टीमचा वापर

IPL 2026 Marathi News : इम्पॅक्ट प्लेअरच्या विरोधात शुभमन गिल; म्हणतो, क्रिकेट हा ११ जणांचाच खेळ आहे.... ! BCCI वरील दबाव वाढतोय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर परिते ग्रामस्थांचा सोमवारी न्याय मोर्चा

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स सुमारे 900 अंकांनी खाली; 'या' मोठ्या कंपन्यांचे शेअर्स घसरले

SCROLL FOR NEXT