Sharad Pawar 
विदर्भ

शरद पवार म्हणतात, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असले तरी मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार एवढंच माझ्या डोक्यात आहे, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला हाणला. 

(सौजन्य : सोशल मीडिया)
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

शिवसेना आणि आमची विचारसरणी वेगवेगळी असली तरी, सरकार चालवण्यासाठी किमान समान कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्‍वास पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली.. हे सरकार पाच वर्षे टिकावे म्हणून आपण स्वतः लक्ष घालू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका नेहमीच धर्मनिरपेक्ष राहिलेली आहे. याकरिताच शिवसेनेसोबत आघाडी करताना किमान समान कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. विकासाभिमुख धोरणे राबविण्याबरोबरच रोजगारासंबंधीच्या समस्या आणि लोकांचे प्रश्‍न सोडविण्याची आमची मनापासून इच्छा आहे. मुख्यमंत्री कोण राहील आणि सरकार केव्हा स्थापन होईल, हे मी सांगू शकत नाही. तीनही पक्षाचे नेते एकमेकांसोबत चर्चा करीत आहेत. तेच काय ते ठरवतील. मात्र, सरकार पाच वर्षे टिकेल आणि मध्यावधीची कुठलीही शक्‍यता नसून, पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचा आम्ही प्रयत्न करू,'' असेही पवार यांनी सांगितले. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचेच सरकार येणार असल्याचा दावा करीत आहेत. याबाबत विचारले असता पवार म्हणाले, मी त्यांना चांगला ओळखतो. ते भविष्यवेत्तेसुद्धा आहेत. प्रचारादरम्यान ते "मी पुन्हा येणार ...मी पुन्हा येणार...' असे सांगत होते. आता भाजपचे सरकार येणार असे म्हणत आहेत.'' असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT