new born babies cried 21 minute in smoke of bhandara district hospital fire 
विदर्भ

भंडारा जिल्हा रुग्णालय आगीचं भयान वास्तव, तब्बल २१ मिनिटे धुरात रडत होती बालके

सकाळ डिजिटल टीम

भंडारा : भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीसंदर्भात भयानक वास्तव समोर आले आहे. रुग्णालयात रात्री १ वाजून ४० मिनिटांनी आग लागली होती. मात्र, बालके धुरामुळे तब्बल २१ मिनिटे रडत होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाला जाग आली होती, अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार दोन नर्सेसच्या निष्काळजीपणामुळे घडला असावा, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

गेल्या ९ जानेवारीला  भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये आग लागल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये तब्बल १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या विभागात 17 बालके होती. यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, तरीही 17 पैकी 10 बालकांचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी या आगीत आगीत जखमी झालेल्या एका बालकाचाही मृत्यू झाला. त्यानंतर राज्य सरकारने आगीच्या घटनेसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले होते. काही दिवसानंतर समोर आलेल्या अहवालात ही घटना शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचे स्पष्ट झाले होते. आता या घटनेचे भयानक वास्तव पुढे आले असून बालके मोठमोठ्यानं २१ मिनिटे रडत असतानाही प्रशासन काहीही करू शकले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या ढिसाळ प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT