file photo
file photo 
विदर्भ

नवीन शैक्षणिक धोरणाबाबत काय म्हणाले डॉ. विजय भटकर...वाचा सविस्तर

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणात संस्कारक्षम शिशू शिक्षणावर भर दिलेला आहे. विद्यार्थ्यांना आवडीप्रमाणे शिक्षण घेता येईल. प्रत्येक व्यक्तीत असलेले युनिक टॅलेंट शोधता येईल. व्यावसायिक शिक्षणाने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होईल. एकाच वेळी कोणताही आवडीचा विषय आता शिकता येणार असल्याने सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकसित होईल. नवीन शैक्षणिक प्रणाली आव्हानात्मक व क्रांतिकारक असून ती प्रत्येक घरात, कुटुंबात कळली पाहिजे, असे विचार पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.

पुसद अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या वतीने रविवारी (ता. ९) आयोजित वेबिनारमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाबाबत डॉ. भटकर बोलत होते. ते म्हणाले की, कस्तुरीरंगन यांनी मांडलेल्या या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत प्रत्येक पातळीवर 'क्‍नफ्युजन' आहे.

मात्र, ते राबवताना शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना मार्ग शोधावे लागतील. विचार क्रांती ही महत्त्वपूर्ण असून समाजात बदल घडविण्यासाठी विचारांचे परिवर्तन आवश्‍यक आहे, ते साधण्याचे काम नवीन शैक्षणिक धोरणातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांनी स्वत:मधील प्रतिभा जागृत करावी

नवीन शैक्षणिक धोरणात आयआयटीप्रमाणे शिक्षणाची 'लिबरल फ्रेमवर्क' राहणार असून विद्यार्थ्यांना स्वत:मधील प्रतिभा जागृत करता आली पाहिजे. या नवीन शिक्षण पद्धतीत शिक्षकांचे स्थान महत्त्वपूर्ण असावे, अशी अपेक्षा डॉ. भटकर यांनी व्यक्त केली.

शाळेत शिकवावी भगवद्‌गीता!

परम संगणकाचे निर्माते डॉ. विजय भटकर यांनी भगवद्‌गीतेचे विचार क्रांतिकारक असून आजही जगाला मार्गदर्शक आहेत. मी जीवनात काय केले पाहिजे, आजचा दिवस आनंदी कसा जाईल, याचा विचार भगवद्‌गीतेत सांगितला आहे. त्यामुळे भगवद्‍गीता शाळेत शिकवायला पाहिजे, तसेच सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत अनिवार्य करावयास हवी, याबद्दल त्यांनी आग्रही भूमिका मांडली.  

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT