Amt city 
विदर्भ

हे आहेत अमरावतीमधील नवे पाच कंटेनमेंट झोन...

सकाळवृत्तसेवा

अमरावती : गेल्या 24 तासांत शहरात चार नवे कंटेनमेंट झोन निर्माण झाले आहेत. यामध्ये जलारामनगर, शिक्षक कॉलनी, मालू ले-आउट, औरंगपुरा व यशोदानगर या भागाचा समावेश आहे. बाधित रुग्णाच्या निवासस्थाना जवळील 50 मीटर भाग प्रतिबंधित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी लागू केले आहेत.

क्‍लस्टरमधील काही झोन निरस्त झाल्यानंतर आता शहरातील मध्यमवर्गीय व उच्चभ्रू वसाहतींमध्ये कोरोनाचे संक्रमण झाले आहे. जलारामनगर, यशोदानगर, गडगडेश्‍वर प्रभागातील शिक्षक कॉलनी तसेच सातूर्णा परिसरातील मालू ले-आउट व औरंगपुरा या भागात संक्रमित रुग्ण आढळल्याने हा भाग खबरदारी म्हणून महापालिका आयुक्तांनी प्रतिबंधित केला आहे.

या आदेशान्वये प्रतिबंधित क्षेत्रातील जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा व औषधी सेवा वगळता इतर सर्व प्रकारचे व्यवहार आणि आवागमनावर प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत. क्‍लस्टरबाहेरील भागात संक्रमण वाढले आहे. जुन्या शहरातील अंबागेट, बुधवारा या भागासह हे पाच भाग आता संक्रमित झाले आहे. फ्रेजरपुरा हा भाग सार्वधिक संक्रमणाचा ठरू लागला आहे. या भागातील संक्रमित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT