new police officers still not appointed in ramnagar police station chandrapur 
विदर्भ

रामनगर पोलिस ठाणे 'रामभरोसे'; पोलिस निरीक्षक रजेवर, ना प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्ती

साईनाथ सोनटक्के

चंद्रपूर : जिल्ह्यातील चांगल्या ठाण्याच्या यादीत अव्वल असलेले रामनगर पोलिस ठाणे सद्यस्थितीत रामभरोसे आहे. पोलिस निरीक्षक प्रकाश हाके मागील काही दिवसांपासून आजारी रजेवर गेले. त्यामुळे पोलिस निरीक्षक शेवाळे यांच्याकडे तात्पुरता प्रभार सोपविला आहे. सोबतच डीबी पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, संतोष दरेकर यांची बदली झाली. मात्र, त्या ठिकाणी नवीन अधिकारी नियुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे पोलिस ठाणे आणि डीबी पथक कायमस्वरूपी अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासावर निश्‍चितच परिणाम झाला आहे.

चंद्रपूर शहरात रामनगर आणि शहर, असे दोन पोलिस ठाणे आहे. रामनगर ठाण्याची जबाबदारी पोलिस निरीक्षक प्रकाश हाके यांच्याकडे आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून हाके रजेवर गेले आहेत. त्यामुळे या ठाण्याचा तात्पुरता प्रभार पोलिस निरीक्षक शेवाळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. चार-पाच दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी जिल्ह्यांतर्गत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात रामनगर डीबी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, संतोष दरेकर यांचा समावेश आहे. कापडे हे स्थानिक गुन्हे शाखेत, तर दरेकर हे राजुरा येथे गेले आहेत. 

पोलिस निरीक्षकच नसल्याने डीबी पथकात नवीन अधिकारी नियुक्त करण्यात आलेले नाही. रामनगर पोलिस ठाण्याची हद्द मोठी असून, गुन्हेगारीच्या घटना येथे मोठ्या प्रमाणात घडत असतात. गुन्ह्यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान या ठाण्यातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसमोर असते. सोबतच मोहल्ला कमिट्यामार्फंत दारूविक्री सुरू आहे. या दारूविक्रीवर आळा घालण्याचीही जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर असते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपासाची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्याचे काम पोलिस निरीक्षक करीत असतात. मात्र, कायमस्वरुपी पोलिस निरीक्षक नसल्याने याबाबतचा निर्णय घेण्यात विलंब होत आहे. त्यातूनच डीबी पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आलेले नाही. परिणामी, नवीन गुन्ह्यांचा तपास करणे, दारूतस्करांच्या मुसक्‍या आवळणे यासर्व कामांवर मोठा परिणाम झाला असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. 

दारूविक्रेत्यांना मोकळे रान -
प्रत्येक प्रभागात अवैध दारूविक्रेते आहेत. या दारूविक्रेत्यांवर आळा घालण्याची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकारी, डीबी पथकाची असते. मात्र, रामनगर पोलिस ठाण्यात कायमस्वरुपी पोलिस निरीक्षक नाही. तसेच डीबी पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नियुक्त नाही. दोन्ही महत्त्वाचे अधिकारी नसल्याने रामनगर ठाणे हद्दीतील दारूविक्रेत्यांसाठी आता मोकळे रान झाले आहे. यातूनच दोन दिवसांपूर्वी तुकुम परिसरात अवैधरीत्या दारूविक्री करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओतून दारूची खुलेआम विक्री होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT