व्हायरल होत असलेली पोस्ट व्हायरल होत असलेली पोस्ट
विदर्भ

‘जंगल में फायर नहीं, फ्लॉवर होने चाहिए’; नव्या पोस्टची धूम

या पोस्टमुळे मेळघाटातील जनतेमध्ये चांगली जनजागृती होत आहे

नारायण येवले

चिखलदरा (जि. अमरावती) : ‘पुष्पा’ चित्रपटाची सध्या सर्वत्र धूम आहे. या चित्रपटातील संदर्भ घेत मेळघाटातील धारणी, चिखलदरा तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात मेळघाट व्याघ्रप्रकल्पाला लागून असलेल्या भागात ‘जंगल में फायर नहीं, फ्लॉवर होने चाहिए’, ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

‘पुष्पा’ चित्रपटावरून ही पोस्ट (new poster of pushpa) तयार करण्यात आली असून, एकाच दिवशी हजारो लोकांनी या पोस्टला पसंती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, फेसबुक व अन्य सोशल मीडियावरूनसुद्धा (Social media) ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. शेकडो लोकांनी ती शेअरसुद्धा केली आहे. या पोस्टमध्ये जंगलात आग लावताना कोणी सापडले तर ५० हजार रुपये दंड व दोन वर्षे कैद होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

मेळघाटातील जंगलात दरवर्षी उन्हाळ्यात आग लागून हजारो हेक्टर जंगल खाक होते. त्यामुळे मेळघाटातील (jungal) कोट्यवधी रुपयांची वनसंपदा नष्ट होते. मात्र, या पोस्टमुळे मेळघाटातील जनतेमध्ये चांगली जनजागृती होत आहे. ही पोस्ट वनविभागाकडून जारी करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी अशा प्रकारच्या पोस्ट तयार करून किंवा फोस्टर लावून जनजागृती केली जाते. जंगल वाचविण्यासाठी ही धडपड सुरू आहे.

वन्यजीव अभ्यासक अमोल सामंत यांनी सोनाळा वनपरिक्षेत्र अकोट वन्यजीवसाठी (jungal) ही पोस्ट तयार केली आहे. अशा पोस्ट दरवर्षी तयार करण्यात येतात आणि त्याचा चांगला फायदा होतो. यावर्षी ‘पुष्पा’ चित्रपटावरून तयार करण्यात आलेल्या या पोस्टमुळे चांगला फायदा होईल.
- डॉ. मयूर भैलुमे, वनपरिक्षेत्र अधिकारी, चिखलदरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

जे बात! हात हातात येणार, शरूच्या प्रेमात शायनरची विकेट पडणार; 'सनई चौघडे' मध्ये नवा ट्विस्ट, प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

२० वर्षीय भारतीय तरुणानं गर्लफ्रेंडला संपवलं, अमेरिकेतून जर्मनीला पळाला; विमानतळावर उतरताच अटक

Prajakta Mali: बर्थडेला शेतात राबली प्राजक्ता माळी; ‘शेतकरी प्रमाणपत्र आहेच’ म्हणत केली भात लावणी, Viral Video

Marathi News Live Updates : झारखंड लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्षांना अटक; CID ने घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT