मागील 12 दिवसांपासून अमरावतीसह यवतमाळ व अन्य काही जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्ट्रेनबाबत शंका आल्याने अमरावती मधून काही नमूने चाचणीसाठी पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेला पाठव 
विदर्भ

मोठी अपडेट: अमरावतीत कोरोनाचा परदेशी स्ट्रेन नाही; नागरिकांना दिलासा; काळजी घेण्याचं आवाहन 

सुधीर भारती

अमरावती ः अमरावती जिल्ह्यामध्ये झपाट्याने रुग्णवाढ होत असून कोरोनाचा नवीन स्ट्रेन असल्याबाबतची चर्चा सुरू होती, मात्र कोरोना विषाणूंचा कोणताही परदेशी "स्ट्रेन' आढळला नसल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे.

मागील 12 दिवसांपासून अमरावतीसह यवतमाळ व अन्य काही जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्ट्रेनबाबत शंका आल्याने अमरावती मधून काही नमूने चाचणीसाठी पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेला पाठविण्यात आले. त्याचा अहवाल आला असून त्यामध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका तसेच ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणुंसारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही, मात्र दैनंदिन रूग्णवाढीची कारणे शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागाने गुरुवार तसेच शुक्रवारी आणखी 75 स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेला पाठविले. यापूर्वी पाठविण्यात आलेल्या स्वॅबबाबतची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नव्हती, त्यामुळे या स्वॅबमध्ये म्युटेशन असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता ती शक्‍यता सुद्धा फेटाळण्यात आली आहे. अमरावतीसह जिल्ह्यात मागील 12 दिवसांच्या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे नागरिकांसोबतच प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

प्रामुख्याने अचलपूर, तिवसा या तालुक्‍यातील काही भागामध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून येताहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून अचलपूर, तिवसासह सुपर स्पेशालिटी कोविड सेंटर तसेच अमरावतीमधील एका खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे स्वॅब एनआयव्हीकडे तपासणीला पाठविले आहे. दोन दिवसांत 75 स्वॅब पाठविण्यात आले असून ज्या भागात कोविडचे अधिक रुग्ण आहेत त्या भागातीलच स्वॅब पाठविण्यात आले आहे.

एनआयव्ही प्रयोगशाळेच्या सूचनेनुसार अचलपूर, तिवसा तसेच अमरावतीमधील काही भागातील रुग्णांच्या स्वॅबचे नमूने एनआयव्हीसाठी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. पुढील निष्कर्षानंतरच काही सांगता येईल.
- डॉ. दिलीप रणमले, 
जिल्हा आरोग्य अधिकारी.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT