News about Yavatmal Legislative Council election 
विदर्भ

जिल्ह्याबाहेरील उमेदवारामुळे शिवसेनेत बंडखोरी? 

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : यवतमाळ विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, भाजपकडून सुमित बाजोरिया, जगदीश वाधवानी यांनी अर्ज भरले. अखेरच्या दिवशी (सोमवारी) अपक्षांसह 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे निष्ठावंत नेते व माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांनी उमेदवारी दाखल केल्याने शिवसेनेत बंडखोरी तर होणार नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (ता. 14) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री संजय राठोड, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे विदर्भ संपर्कप्रमुख अरविंद नेरकर, माजीमंत्री प्रा. वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, मनोहर नाईक, आमदार डॉ. वजाहात मिर्झा, ख्वाजा बेग, माजीमंत्री माणिकराव ठाकरे, सतीश चतुर्वेदी आदींची उपस्थिती होती. 

महाविकास आघाडीच्या उमेदवाराने विजयाचा दावा करीत शक्तिप्रदर्शन केले. त्याच तोडीचे भाजपनेही शक्तिप्रदर्शन केले. जिल्हाभरातील पक्षाचे व सहयोगी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना बोलविण्यात आले होते. भाजपकडून सुमीत बाजोरिया व नगरसेवक जगदीश वाधवानी यांनी आपले नामांकन दाखल केले. यावेळी माजी पालकमंत्री मदन येरावार, माजीमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, ऍड. नीलय नाईक, डॉ. संदीप धुर्वे, जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा आदींची उपस्थिती होती. माजी पालकमंत्री मदन येरावार यांनी विजयाचा विश्‍वास व्यक्त केला. जिल्ह्यात भाजप सर्वांत मोठा पक्ष आहे. जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना-कॉंग्रेस अशी आमची यापूर्वी युती होती. त्यामुळे सर्वांसोबत चांगले संबंध कायम आहेत. याचा निश्‍चितच फायदा भाजपला होणार असल्याचा विश्‍वास येरावार यांनी व्यक्त केला. 

तीन पक्ष एकत्र असतानाही त्यांना जिल्ह्यातील उमेदवार मिळू नये, ही शोकांतिका असल्याची कोपरखळी भाजप नेत्यांनी कुणाचेही नाव न घेता महाविकास आघाडीला लगावली. महाविकास आघाडीकडून विधान परिषदेची उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. उमेदवारी आपल्याला मिळावी यासाठी नेते प्रयत्नरत होते. यात चतुर्वेदी यांनी बाजी मारली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय निश्‍चित आहे. महाआघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी सर्वच नेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विजय आमचाच होईल, असा विश्‍वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला. 

शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना असला तरी अपक्षांनीही यात उडी घेतली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य माजी आमदार श्रीकांत उर्फ बाळासाहेब मुनगिनवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. संजय देरकर, शंकर बडे, दीपक निलावार, प्रशांत पवार, मोहम्म आरीफ सुरैय्या, राजू दुधे, नूर महमदखान, सतीश भोयर यांनी मंगळवार (ता.14) उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे विधान परिषद निवडणुकीतही आता चुरस निर्माण झाली आहे. बुधवार (ता.15) अर्जाची छाननी होणार असून शुक्रवारी (ता.17) उमेदवारी मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. यानंतरच विधान परिषद पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. 
 

489 उमेदवार बजावणार हक्क

 विधान परिषद पोटनिवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती, नगरसेवक असे 490 मतदारांची प्रारूप मतदारयादी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केली होती. उमरखेड पालिकेतील नगरसेवक अविनाश अग्रवाल यांनी राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त झाली आहे. यामुळे अंतिम मतदारयादीतून एक नाव कमी करण्यात आले आहे. परिणामी, आता 489 मतदार विधान परिषद पोटनिवडणुकीत मतदान करणार आहे. 


माझी उमेदवारी शिवसैनिकांच्या भरवशावर

 मी शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी मी निष्ठेने काम केले आहे. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्याच्या प्रश्‍नांवर आंदोलन केले आहे. त्यासाठी गुन्हे दाखल झाल्याची पर्वा केली नाही. शिवसेना वाढावी हाच उद्देश होता. त्यानंतरही पक्षाकडून निष्ठावंतांची दखल घेतली जात नाही. कॉंग्रेस नेत्यांच्या मुलांना शिवसेनेची उमेदवारी दिली जात आहे. हा शिवसैनिकांचा अपमान आहे. हा अन्याय सहन करणार नाही, हे दाखविण्यासाठी माझी उमेदवारी कायम राहणार आहे. शिवसैनिक तसेच इतर पक्षातील मित्रांच्या मदतीने ही निवडणूक लढणार असल्याचे माजी आमदार श्रीकांत उर्फ बाळासाहेब मुनगिनवार यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election 2025 : अखेर मनपा निवडणुका जाहीर, मतदान अन् निकालाची तारीख काय? कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा....

BMC Election: सत्ता, संघर्ष आणि संधी... बीएमसीच्या गेल्या ५ निवडणुकांचे निकाल काय होते? जाणून घ्या मुंबई महापालिकेचा राजकीय प्रवास...

Latest Marathi News Live Update : महानगरपालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार

IPL 2026 Auction : उद्या लिलाव अन् पठ्ठ्याने आज ठोकले खणखणीत शतक... कुटल्या १५ चेंडूंत ७२ धावा; RCB च्या माजी खेळाडूची धमाल

हॉलिवूड हादरलं ! हॅरी मेट सॅली फेम प्रसिद्ध दिग्दर्शक आणि त्याच्या पत्नीची राहत्या घरी निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT