khau
khau 
विदर्भ

जगण्यासाठी संघर्ष करतेय ही चिमुकली, तरीही केले हे कौतुकास्पद काम

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : कोरोना युद्धात प्रत्येक जण आपली भूमिका बजावत आहे. कोरोनाचा अटकाव करण्यासाठी निधी उभापण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. अशात यवतमाळच्या एका नऊ वर्षीय चिमुकलीने सुद्धा कोरोना निधीसाठी आपल्या खाऊचे पैसे दिले आहेत. तिच्या या कृतीमुळे भावूक झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी तिच्या घरी जाऊन वाढदिवस साजरा केला.

कुरेशीपुरा, कळंब चौक, यवतमाळ येथील नऊ वर्षीय झरीन समीर शेख या मुलीचा पोलिस दलातर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, ही छोटीशी मुलगी किडनीच्या आजाराने ग्रस्त आहे. अशा या परिस्थितीतसुद्धा आपल्या वाढदिवशी या चिमुकलीने आपल्या पिगीबॅंकमध्ये जमा झालेली रक्कम कोवीड-19 सारख्या आजाराशी सामना करण्याकरिता मदत म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदिप शिरस्कर यांना सुपूर्द केली.

खाऊची रक्कम दिली कोरोना निधीला मदत
या अशा परिस्थितीत या चिमुकलीने केलेली मदत फारच मोलाची आहे. त्याद्वारे तिने
" लहान जरी आम्ही असलो,
तरी मोठे अमुचे मन..
कोरोनाचा सामना करुया,
मिळूनी आपण सारे जण....

असा सुंदर संदेश दिला आहे. लॉकडाउनमुळे कुणाला घराबाहेर जाता येत नाही. तसे आवाहन जनतेला करण्यात येत आहे. अशाही स्थितीत लोक मदत करीत आहेत, याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवीन शिक्षकांना ‘पुन्हा बदली मागणार नाही’ असे लेखी देण्याचे बंधन! विनंती बदल्यानंतर नवीन भरती झालेल्यांना नियुक्ती; विनंती बदलीसाठी 3000 अर्ज

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; निलेश लंके, संदीपान भुमरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

Arvind Kejriwal : देशभर २४ तास वीज, मोफत शिक्षण ; केजरीवालांनी दिली ‘गॅरंटी’,‘एमएसपी’चेही आश्‍वासन

Sakal Podcast: महाराष्ट्रात आज ११ जागांसाठी मतदान ते महाराष्ट्रात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट!

Panchang 13 May : आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्राचे पठण करावे

SCROLL FOR NEXT