विदर्भ

रस्ते, पूल बांधकामामुळे वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती

सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा) : वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी केंद्र सरकारकडून देण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोट्यवधींचे रस्ता व पूल बांधकामे (Construction of crores of roads and bridges) झाले आहेत. अनेक कामांना मंजुरी (Approval of several works) प्रदान करण्यात आली आहे. यामुळे वर्धा जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली (The development of Wardha district gained momentum), असे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. (Nitin-Gadkari-said-Construction-of-roads-and-bridges-accelerates-the-development-of-Wardha-district)

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग सातवरील हिंगणघाट येथील नांदगाव चौरस्त्यावरील ८५.२८ कोटींच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी, महामार्गावरील शेडगाव चौरस्ता येथे ४७.७८ कोटींच्या प्रस्तावित उड्डाणपुलाचे भूमिपूजन केले. हिंगणघाट कृषी बाजार समितीच्या कार्याची प्रशंसा करून बाजार समितीने सहकार्य केल्यास शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्यासाठी शीतगृहाचे बांधकाम करण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन गडकरी यांनी सभापती सुधीर कोठारी यांना दिले. तसेच हिंगणघाट बाजार समितीने योगदान दिल्यास हिंगणघाट येथे अद्यावत रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय उभारणे शक्य आहे. यासाठीसुद्धा सर्वपरी सहकार्य करण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले.

वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेमडीसिव्हर औषधीची निर्मिती होत असल्याने जगात वर्धा जिल्ह्याचे नाव पोहोचले असल्याचे गडकरी यांनी सांगितले. जिल्ह्यात मोठ्या संखेने ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होत असल्याने कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही याची त्यांनी ग्वाही दिली. सरतेशेवटी कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

(Nitin-Gadkari-said-Construction-of-roads-and-bridges-accelerates-the-development-of-Wardha-district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT