No action for prevention of corona is taken in Z.P. 
विदर्भ

मिनी मंत्रालयातच होतेय सरकारी आदेशाची पायमल्ली, कोरोना काळात स्वच्छतेचे तीनतेरा

सुधीर भारती

अमरावती : ग्रामीण भागात कोरोनाविरोधातील लढ्याचे रणशिंग फुंकणाऱ्या जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतच स्वच्छतेचे पार तीनतेरा वाजले आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण जिल्ह्याला हात धुण्याचे आवाहन करीत फिरणाऱ्या प्रशासनाचे पितळ  मुख्यालयातच उघडे पडले आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने बाहेरून येणाऱ्या अभ्यागत तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कार्यालयाच्या बाहेर पाणी, हॅण्डवॉश किंवा साबणाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. या निर्देशांचे थातूरमातूर पालन करणाऱ्या जिल्हा परिषदेने सुरुवातीला काही दिवस पाण्याचे ड्रम तसेच साबणाची व्यवस्था केली. मात्र 8 ते 10 दिवसांतच हा उत्साह मावळला. आजच्या स्थितीत चित्र असे आहे की काही ठिकाणी नुसतेच पाण्याचे कोरडे ड्रम उभे आहेत. काहींच्या तोट्या तुटल्या, कुठे पाणी आहे मात्र साबण नाही, विशेष म्हणजे सभापतींच्या कक्षासमोर केवळ हात धुण्याच्या सूचना आहेत, तिथे काहीच साहित्य नाही. असे चित्र पाणीपुरवठा विभाग, सामान्य प्रशासन, अर्थ विभाग, समाजकल्याण विभाग, सिंचन विभाग, पाणी व स्वच्छता विभाग तसेच पदाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर दिसून येते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे आहे. असे असले तरी प्रत्यक्षात मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातच कोरोनाविरोधी लढ्यातील महत्त्वाचा घटक असलेल्या स्वच्छतेचा पार धिंगाणा उडाला आहे.

काय आहे शासनादेश?

प्रत्येक कार्यालयासमोर हात धुण्यासाठी स्वच्छ पाणी, हॅण्डवॉश अथवा साबण, एखादा टॉवेल ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय बाहेरून येणाऱ्यांकरिता सोशल डिस्टन्सिंगसाठी वर्तुळ आखण्यात यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare Viral Photo Controversy : रुपाली चाकणकरांनंतर आता सुनील तटकरेंही गोत्यात? 'त्या' फोटोने वाढवलं टेन्शन! भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण भोवणार?

अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं, शेवटच्या व्हिडीओत मंत्र्याचं नाव घेतलं; मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रि‍पदाचा राजीनामा

Video: 6.6,6,6,6... KKR च्या युवा फलंदाजाने IPL पूर्वीच शतक करत दाखवली ताकद; प्रतिस्पर्ध्यांना रहावे लागेल अलर्ट

MSRTC: एसटीला दिलासा! दरवर्षी २४१ कोटींची बचत होणार, उत्पन्न वाढीसाठी परिवहनमंत्र्यांचा मोठा निर्णय

Pune समलैंगिक संबंधांना विरोध, २१ महिन्यात २ अल्पवयीनांची हत्या; २२ वर्षीय तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT