No Air available on petrol pumps in gadchiroli to fill in vehicles
No Air available on petrol pumps in gadchiroli to fill in vehicles  
विदर्भ

पेट्रोलनं गाठला उच्चांक अन् आता हक्काची हवाही मिळेना; गडचिरोलीतील पंपांची दैना; मालकांचं दुर्लक्ष  

मिलिंद उमरे

गडचिरोली : कोणत्याही प्रमाणीत पेट्रोल पंपावर वाहनात मोफत हवा भरण्याची सुविधा असते. पण, गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपावर हवा भरण्याची मशीनच नाही किंवा जिथे आहे तिथे ते बंद अवस्थेतच दिसून येते. त्यामुळे सरकारचे निर्देश असतानाही ग्राहकांच्या वाहनांना पेट्रोलपंपावर हक्‍काची हवा मिळत नाही. याशिवाय ग्राहक आपल्या सुविधांबद्दल कोणत्याच प्रकारची विचारणा करत नसल्याने अनेक पेट्रोल पंप मालक ग्राहकांच्या सुविधांकडे कानाडोळा करत आहेत.

कोणत्याही पेट्रोल पंपावर ग्राहकांना काही सुविधा मोफत असतात. त्या सुविधांचा लाभ घेण्याचा ग्राहकांना हक्‍क असतो. पण, या सुविधांबद्दल सरकारकडून कोणत्याही प्रकारची जनजागृती केली जात नाही. पेट्रोल पंपावरही अशा कुठल्याही माहितीचे फलक नसतात. त्यामुळे ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा अनेक पेट्रोल पंप मालक घेत आहेत. गडचिरोली शहरात पाच पेट्रोलपंप आहेत. पण, यातील एकाही पेट्रोल पंपावर मोफत हवा भरून मिळत नाही. येथील बट्टूवार पेट्रोल पंपात वाहनात हवा भरण्याचे मशीन आहे. पण, हे मशीन मागील अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहे. 

खरेतर आता बदलत्या युगात नवे तंत्रज्ञान आले असून पेट्रोल पंपावर हवा भरण्याच्या अत्याधुनिक मशीनही आल्या आहेत. आरमोरी येथील पेट्रोल पंपावर अशी सुविधा उपलब्ध आहे. येथील स्वयंचलित आधुनिक मशीनद्वारे वाहनाच्या चाकातील हवेचा दाब तपासला जातो. हा दाब कमी असेल तर हवा भरून योग्य पातळीवर वाढवला जातो किंवा अधिक असेल, तर हवा कमी करून योग्य पातळीवर आणला जातो. त्यामुळे वाहनात हवेचा योग्य दाब राहिल्याने वाहन सुस्थितीत राहते शिवाय वाहन चालविताना चाकांचे रस्त्याशी होणाऱ्या घर्षणामुळे हवेचे प्रसरण होऊन चाक फुटण्याच्या घटना घडत नाहीत. म्हणून अशा प्रकारच्या मशीन्स सर्वच पेट्रोल पंपांवर असणे आवश्‍यक आहे. असे असतानाही जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. 

ग्राहकही याबद्दल काही बोलत नसल्याने पेट्रोल पंपमालकांचे फावत आहे. पेट्रोल देण्याच्या मशीनच्या आकड्यात बदल करणे, ग्राहकांशी उर्मट वागणे, रांग मोडणाऱ्या ओळखीच्या ग्राहकांना पेट्रोल देणे, घाईत असलेल्या ग्राहकांना जुन्या, फाटक्‍या, रंग लागलेल्या, चिकटपट्टीने चिकटविलेल्या नोटा देणे, असे अनेक प्रकार कित्येक पेट्रोलपंपांवर घडत असल्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

या आहेत मोफत सुविधा....

कोणत्याही पेट्रोल पंपावर सामान्य लोकांच्या गाडीमध्ये हवा भरण्याची सुविधा अगदी मोफत पुरवली जाते. त्यामुळे पेट्रोल पंपाच्या मालकाला हवा भरण्याची इलेक्‍ट्रॉनिक मशिन पेट्रोल पंपावर लावावी लागते. सोबतच टायरमध्ये हवा भरण्यासाठी एका व्यक्तीला तेथे थांबावे लागते. पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरल्यानंतर तुम्हाला बिल घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. याशिवाय पेट्रोल पंपावर पिण्याच्या पाण्याची सुविधा मोफत, वॉशरूमची सुविधादेखील मोफत असते, जर वॉशरूम तुटलेले फुटलेले किंवा अस्वच्छ असेल तर तुम्ही तक्रार करू शकता, सामान्य जनतेसाठी फोन कॉलची सुविधा देखील उपलब्ध केली पाहिजे, प्रथमोपचार साहित्य, फायर सेफ्टी डिवाइसेज आवश्‍यक असतात. तुम्ही पेट्रोल भरता तिथून बिल घेणे हा तुमचा अधिकार आहे. 

सर्व ग्राहकांना क्‍वालिटी आणि क्वांटीटी जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमती डिस्पलेवर दर्शवणे गरजेचे आहे, सर्व पेट्रोलपंपावर तक्रार पेटी असायला हवी, पेट्रोल पंपावर मालक आणि पेट्रोलियम कंपनीचे नाव आणि कॉन्टॅक्‍ट नंबर देणे गरजेचे आहे, पेट्रोल पंप सुरू होण्याची आणि बंद होण्याची वेळ दर्शविणे गरजेचे आहे. सुविधा मिळत नसतील तर ग्राहक आपली तक्रार सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रीवेंस रिड्रेस ऍण्ड मॉनिटरिंग सिस्टिम या पोर्टलवर जाऊन करू शकतात.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Chinmay Mandlekar: "मला वाटलं ते मुस्काटात मारतील..."; चिन्मय मांडलेकरनं सांगितला रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

SCROLL FOR NEXT