Coronavirus 
विदर्भ

या जिल्ह्यात नाही एकही कोरोनाचा रुग्ण! खबरदारी मात्र पूर्ण

सकाळ वृत्तसेवा

भंडारा  : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण नसला तरी जिल्हा प्रशासन डोळ्यात तेल घालून काम करीत आहे. आतापर्यंत 118 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 105 व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. लगतच्या नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने जिल्हा सीमेवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे लक्षात येताच केंद्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केले.
शीघ्र प्रतिसाद पथकाद्वारे भेट देऊन तपासणी केल्यावर आजवर जिल्ह्यात 19, 972 व्यक्ती पुणे, मुंबई व इतर राज्यातून आल्याचे समोर आले आहे. त्यापैकी 2,945 व्यक्तींनी होमक्वारंटाइनचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण केला. तर 17, 027 व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले असून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा स्टॅम्प लावण्यात आला आहे.
आतापर्यंत 62 व्यक्तींना हॉस्पिटल क्वारंटाईनमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 14 एप्रिलपर्यंत 118 व्यक्तींचे नमुने इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय (मेयो) नागपूर येथे पाठविण्यात आले होते. यातील 105 व्यक्तींचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर, 13 व्यक्तींचे नमुने अप्राप्त आहेत. सध्या 12 व्यक्ती विलगीकरण कक्षात आहेत. तर, 30 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला नाही. तरीसुद्धा शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

सविस्तर वाचा - विदर्भवाद्यांनी केले आंदोलन स्थगित...हे आहे कारण
भंडारा जिल्ह्यामधील 9 शासकीय वसतिगृहामध्ये विस्थापित तसेच मजूर यांच्यासाठी निवारागृह उभारण्यात आले आहे. येथे आलेल्या कामगार व मजूर व्यक्तींची  तपासणी तज्ञ डॉक्‍टरांमार्फत करण्यात येते आहे. या ठिकाणी भोजन, वैद्यकीय तपासणी, योग व समुपदेशनाची व्यवस्था आहे.  जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार संचारबंदी व लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल केल्या जात आहे. तसेच मास्क वापरण्याची सक्ती केली जात आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र येथे फ्ल्यू ओपीडी सुरू करण्यात आली. तसेच आतापर्यंत "सारी'च्या तपासणीसाठी 13 व्यक्तींना भरती करुन त्यांचेही नमुने नागपूरच्या मेयो येथे पाठविले होते. ते सर्व नमुने निगेटीव्ह आले आहेत. गावपातळीवर आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत सर्वेक्षण सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT