milk. 
विदर्भ

का आली लाखो लीटरची दूध विक्री अर्ध्यावर?

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : लॉकडाऊनमध्ये चहा टपऱ्या, हॉटेलस बंद असल्यामुळे दुधविक्रेत्यांनाही या लॉकडाऊनचा चांगलाच फटका बसला आहे. दूध हा नाशवंत पदार्थअसल्यामुळे भाजी,फळविक्रेत्यांप्रमाणेच दूध विक्रेत्यांचेही या काळात आर्थिक नुकसान झाले.
कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर झाले. मार्च महिन्यापासून हॉटेल, चहाटपऱ्या बंद होत्या. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांवरही शासनाने या कालावधीत बंदी घातली होती. त्याचा मोठा फटका दूधविक्रेत्यांना बसला. पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात दररोज दोन ते अडीच लाख लिटर दूध विक्री व्हायची. आता केवळ तीस ते चाळीस हजार लिटर दुधाची विक्री सुरू आहे. कोरोनामुळे दूध विक्रेतेही हतबल झाले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात नागपुरातून दिनशा, हल्दीराम, अमूल, महानंदा, गोवर्धन, मदरडेअरीचे दूध येते. चंद्रपूर शहरात असलेल्या शासकीय दुग्ध डेअरीतून आरेचे दूध तयार केले जाते. शासकीय दुध विक्रीतून अत्यल्प कमिशन मिळते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात दिनशा, हल्दीराम, अमूल, महानंदा, गोवर्धन या खासगी दूध कंपनीने मोठ्या प्रमाणावर आपले जाळे पसरविले आहे. विक्रेत्यांना या कंपन्या शासनापेक्षा जास्त कमिशन देतात. त्यामुळे विक्रेत्यांनीही शासकीय कंपन्यांना नकार देत खासगी दुग्ध कंपन्यांचा हात पकडला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दररोज दोन ते अडीच लाख लिटर दुधाची दररोज विक्री व्हायची. उन्हाळ्यात लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणावर होतात. तसेच लस्सी, ताक, कुल्फीसह अन्य खाण्याच्या वस्तूंची विक्री वाढते. त्यामुळे दुधाच्या विक्रीत मोठी वाढ होत असते. मात्र, यंदा दुधविक्री वाढण्याऐवजी त्यात मोठी घट होत असल्याचे चित्र आहे.
मार्च महिन्यात कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर झाले. या काळात औषध, भाजीपाला, किराणा, पेट्रोलंपप वगळता सर्वच बंद होते. चहाटपऱ्या, हॉटेलमध्ये दुधाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. उन्हाळ्याच्या दिवसांत लस्सी, कुल्फी तयार करण्याच्या कामातही दुधाचा वापर होतो.
मात्र, मार्च महिन्यापासून हॉटेल, चहाटपऱ्या बंद होत्या. लग्नसमारंभांवरही राज्य शासनाने बंदी घातली होती. त्यामुळे दुधाच्या मागणीत मोठी घट झाली. राज्य शासनाने आता लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली आहे. चहाटपऱ्या, हॉटेल काही वेळापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दूध विक्रीत थोडी वाढ झाली आहे. मार्च महिन्यांपूर्वी चंद्रपूर शहरात दररोज 60 ते 70 हजार खासगी दुध यायचे. आता केवळ वीस ते तीस हजार लिटरच दूध विक्री सुरू असल्याचे येथील विक्रेते वतन कोकास यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. कोरोना विषाणूमुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनचा दूध व्यवसायाला मोठा फटका बसला. शासनाने आम्हाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दूधविक्री अर्ध्यावर
लॉकडाउनचा मोठा परिणाम दूध व्यवसायावर झाला. पूर्वी चंद्रपूर शहरात 60 ते 70 हजार लिटर दूध खासगी कंपन्यांचे यायचे. आता मात्र विक्री अर्ध्यावर आली. त्याचा विक्रेत्यांना मोठा फटका बसत आहे. लॉकडाउनमध्ये थोडी शिथिलता आल्याने थोडेफार दूध विक्री सुरू आहे. मात्र, नेहमीपेक्षा कमी आहे.
पवन कांडलकर, वितरक, चंद्रपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT