जारावंडी परिसराचा लगतच्या आदिवासी भागातील 50 ते 60 गावांशी संपर्क जोडला आहे. म्हणजे जवळपास 15 ते 20 हजार लोकसंख्या आहे. परंतु या परिसरात बॅंक व इंटरनेटची सुविधा नसल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. 
विदर्भ

एक गाव, सुविधांचं नाही नाव!  ना बँक ना इंटरनेटची सुविधा; बांबूला डोंगल बांधून करतात इंटरनेटचा वापर

सकाळ डिजिटल टीम

जारावंडी (जि. गडचिरोली) : एटापल्ली तालुक्‍याच्या शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या जारावंडी परिसरात अद्याप राष्ट्रीयीकृत बॅंकेची शाखा नसून येथे इंटरनेटसेवाही नाही. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

जारावंडी परिसराचा लगतच्या आदिवासी भागातील 50 ते 60 गावांशी संपर्क जोडला आहे. म्हणजे जवळपास 15 ते 20 हजार लोकसंख्या आहे. परंतु या परिसरात बॅंक व इंटरनेटची सुविधा नसल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे. बॅंक व्यवहाराबद्दल नागरिक अनभिज्ञ आहेत. त्यामुळे नागरिकांनी बॅंकेची व इंटरनेटची तत्काळ सुविधा देण्याची मागणी केली आहे. 

सध्या बॅंकेत खाते उघडण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. प्रत्येक कामासाठी बॅंकेचे खाते अनिवार्य झाले आहे. प्रत्येक योजनेचा आर्थिक लाभ, प्रत्येक कामाचा मोबदला बॅंकेच्या खात्यावरच जमा केला जातो. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनेचे अर्थसहाय राष्ट्रीयीकृत बॅंक खात्यामध्ये जमा होते. महिला बचतगटाचा वाढलेला व्याप विस्तार, वृद्धांना मिळणारे निवृत्ती अर्थसाहाय्य, गरिबांना मिळणाऱ्या घराच्या बांधकामाचा आर्थिक अर्थसाहाय्य लाभ, रोजगार हमी योजनेच्या कामाचा मोबदला, शेतकऱ्यांचे पीक कर्ज, सोने तारण, इतर प्रकारचे कर्ज आणि विविध योजनेची आर्थिक मदत आणि वैयक्तिक दैनंदिन आर्थिक व्यवहार असे एकंदरीत सर्वच व्यवहार बॅंकेमधून होत आहेत परंतु जारावंडीत बॅंकच नसल्याने नागरिक या सर्व गोष्टीपासून वंचित आहेत. 

जारावंडी परिसरात राष्ट्रीयीकृत बॅंक नसल्याने नागरिकांना थेट 55 किमी अंतर गाठून एटापल्लीला जावे लागते. तिथेही रोजच गर्दीच महापूर असतो आणि नेटची चांगली सुविधा नसल्याने अनेकवेळा लिंक फेल होते. तिथे बसण्याची पुरेशी सुविधाही नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना चक्कर येऊन पडण्याचे प्रकारही घडत आहेत. अशातच पैसे भरण्यासाठी व काढण्यासाठी सुमारे 55 किमी अंतरावर गेलेल्या लोकांना काम न करताच परतावे लागतो. म्हणून या सर्व बाबी जाणून जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ बॅंकेची सुविधा करून द्यावी, अशी मागणी होत आहे. 

जारावंडी परिसरात इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे परिसरातील लोक ऑनलाइन गोष्टीबद्दल अनभिज्ञ आहेत. आजकाल सर्व कार्यालयीन खासगी व शासकीय कामे ऑनलाइन झाली आहेत. परंतु परिसरात इंटरनेटची सुविधा नसल्याने लोकांना थेट छत्तीसगड राज्यात जावे लागते. येथे पोलिस ठाणे, डाक विभाग, प्राथमिक आश्रमशाळेत, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय रुग्णालय, महसूल, महिला बचतगट, वनविभाग, अशी अनेक कार्यालये आहेत. जवळपास ही सर्वच कार्यालये इंटरनेटशी जोडणे अनिवार्य आहे. पण, अनेक समस्या येत आहेत.

बांबूचा करतात वापर

जारावंडी परिसरातील गावात बीएसएनएलची सेवा वापरली असली, तरी ती नीट नाही. शासकीय व खासगी व अन्य कार्यालयांत इंटरनेटची कामे छत्तीसगडवरून खासगी कंपन्यांचे डोंगल बांबूला बांधून वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. पण, माहिती वहन क्षमता कमी असल्याने दहा मिनिटांच्या कामाकरिता किमान तासाभराचा वेळ खर्ची घालावा लागत आहे. यात कर्मचारी तसेच नागरिकांना मनस्ताप होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT