notice to bogus farmer for refund kisan samman nidhi in mahagaon of yavatmal 
विदर्भ

किसान योजनेतील बोगस लाभार्थ्यांकडून रक्कम करणार वसूल, ३१९ जणांना नोटीस

रजतकुमार खाडे

महागाव (जि. यवतमाळ) : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत महागाव विभागातील 319 कर भरणाऱ्यांच्या खात्यांवर निधी जमा झाला आहे. कर भरणारे लोक योजनेसाठी पात्र नसल्याने अशा लोकांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम वसूल करण्याचे आदेश तहसील कार्यालयाला दिले आहेत. तशी नोटीस तहसील कार्यालयाने 319 लाभार्थ्यांना बजावली आहे. 

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची व्यवस्था आहे. मात्र, योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी काही निकष असून, कर भरणारे योजनेसाठी पात्र ठरू शकत नसल्याचा मुख्य निकष आहे; तरीही काही शेतकऱ्यांनी योजनेंतर्गत लाभासाठी अर्ज केले होते. प्राथमिक टप्प्यांत असे लाभार्थी पात्र ठरल्याने त्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने निधी जमा झाला आहे. काही जणांच्या खात्यावर दोन; तर काही जणांच्या खात्यात तीन, चार व पाच हप्ते जमा झाले आहेत. मात्र, खात्याच्या वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर अर्जधारकांची छाननी झाल्यावर काही लाभधारक हे कर भरणारे असल्याचे आढळून आले. त्यांनी जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये आधारकार्ड आहे.

आधारकार्ड हे पॅनकार्डशी लिंक असल्याने कर भरणारे लोक उघडकीस आले आहेत. खात्याने तातडीने तहसील अधिकाऱ्यांना पत्र पाठवून अशा लाभार्थ्यांना नोटीस बजावून जमा झालेली रक्कम वसूल करण्यास सांगितले आहे. अपात्र लाभार्थ्यांना जमा झालेली रक्कम धनादेश किंवा डीडी स्वरूपात तहसील कार्यालयात जमा करावी लागणार आहे. योजनेपासून अद्याप जे शेतकरी वंचित आहेत. अशा शेतकऱ्यांनी अर्जासह आवश्‍यक कागदपत्रे ग्राहक सेवा केंद्रात जमा करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

कर भरणाऱ्या लोकांना योजना लागू होत नाही; तरीही अर्ज केल्याने त्यांच्या खात्यांवर निधी जमा झाला आहे. आधारकार्ड पॅनकार्डला लिंक असल्याने चौकशीवेळी कर भरणारे लाभार्थी उघडकीस आले आहेत. जवळपास 319 अशा लाभार्थ्यांना जमा झालेली रक्कम परत करण्याची सूचना नोटिशीतून केली आहे. 
- नामदेव ईसळकर, प्रभारी तहसीलदार, महागाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT